Chanakya Niti | प्राचीन काळातील महान विद्वान आणि तत्त्वज्ञ आर्य चाणक्य (Chanakya) यांनी त्यांच्या ‘चाणक्य नीती’ या ग्रंथातून जीवनातील अनेक महत्त्वाच्या बाबी मांडल्या आहेत. यशस्वी होण्यासाठी काही गुण अंगी असणं आवश्यक आहे, अन्यथा कितीही मेहनत केली तरी यश हुलकावणी देतं, असं चाणक्य स्पष्ट सांगतात.
यशापासून दूर ठेवणारे दोष कोणते?
आर्य चाणक्य हे केवळ अर्थशास्त्रज्ञ नव्हते तर त्यांनी समाजव्यवस्था, कुटुंबजीवन, राजकारण आणि वैयक्तिक यश-अपयश यावरही सखोल विचार मांडले आहेत. ‘चाणक्य नीती’ या ग्रंथात त्यांनी स्पष्ट केलं आहे की प्रत्येक माणसात काही अशा त्रुटी असतात ज्या दूर केल्या नाहीत, तर त्या व्यक्तीने कितीही मेहनत केली तरी यश त्याला प्राप्त होत नाही. म्हणूनच चाणक्य सांगतात की, व्यक्तीने स्वतःमधील अशा दोषांना ओळखून त्यांच्यावर काम करणं गरजेचं आहे.
त्यांनी सांगितलेले सर्वात महत्त्वाचे गुण म्हणजे शिस्त (discipline). त्यांनी म्हटलं आहे की, कुणी कितीही प्रयत्न करत असला, तरी जर त्याच्या आयुष्यात शिस्त नसेल तर त्याचे सगळे प्रयत्न वाया जातात. शिस्त ही यशाचा मूलमंत्र आहे. तीच व्यक्ती यशस्वी होते जी नियमबद्ध जीवन जगते. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी शिस्तीचं पालन करणं अनिवार्य आहे, असं चाणक्य ठामपणे सांगतात.
संयम आणि प्रामाणिकपणा
चाणक्य पुढे सांगतात की शिस्त जितकी आवश्यक आहे, तितकाच संयम (patience) सुद्धा महत्त्वाचा आहे. संयम नसलेली व्यक्ती थोड्याशाच अडचणीत गोंधळून जाते आणि त्यामुळे ती हातात आलेलं यश गमावते. संयमी व्यक्ती मात्र संकटांमध्येही स्थिर राहते आणि अखेर विजय प्राप्त करते. संयम ठेवल्यास योग्य वेळ आल्यावर यश मिळणं निश्चित आहे.
या सर्वांसोबतच चाणक्य प्रामाणिकपणा (honesty) हाही महत्त्वाचा घटक मानतात. मेहनतीसोबतच जर प्रामाणिकपणा असेल तर यश लवकरच त्या व्यक्तीच्या पावलांशी जुळतो. फसवणूक, आळस आणि खोटेपणा यामुळे मिळालेलं यश टिकत नाही. त्यामुळे खऱ्या यशासाठी कष्टाला प्रामाणिकपणाची जोड द्यावी, असं चाणक्य स्पष्टपणे सांगतात.
Title : Chanakya Niti about Success and mistakes









