विराट कोहलीच्या शतकी खेळीचा पाकिस्तानातही जल्लोष; व्हिडीओ तुफान व्हायरल

On: February 24, 2025 10:44 AM
Champions Trophy 2025 Virat Kohlis Century Celebrated in Pakistan 
---Advertisement---

Champions Trophy 2025 | भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (Champions Trophy 2025) पाकिस्तानवर ६ गडी राखून मात करत शानदार विजय मिळवला. या स्पर्धेतील भारताचा हा दुसरा विजय ठरला असून, या विजयाचा शिल्पकार विराट कोहली (Virat Kohli) ठरला. या विजयासह, भारत ‘ग्रुप एमध्ये’ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. विराटने नाबाद १०० धावांची खेळी साकारत संघाला विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे, या शतकी खेळीनंतर पाकिस्तानातील (Pakistan) चाहत्यांनीही जल्लोष साजरा केला.

विराटची संयमी खेळी

विराट कोहलीने संयमी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. त्याने १०० धावांमध्ये ७ चौकार मारले, तसेच ७२ धावा धावून पूर्ण केल्या. विराटने १११ चेंडूंमध्ये १०० धावा करत संघाला विजय मिळवून दिला. भारताने पाकिस्तानला ४५ चेंडू आणि ६ गडी राखून पराभूत केले. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २४१ धावा केल्या होत्या.

विराट कोहलीने चौकार मारत शतक पूर्ण केले आणि भारताला विजय मिळवून दिला. या विजयाचा जल्लोष देशभरात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे, भारतासोबतच पाकिस्तानातील विराट कोहलीच्या चाहत्यांनीही जल्लोष केल्याचे समोर आले आहे.

कुलदीप आणि श्रेयसची कामगिरी

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण हा निर्णय त्यांच्यासाठी चुकीचा ठरला. कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) ९ षटकांमध्ये ४० धावा देत ३ बळी घेतले.

मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) आणि सउद शकील (Saud Shakeel) यांच्यात १०४ धावांची भागीदारी झाली होती, ती अक्षर पटेलने (Axar Patel) मोडली. त्याचवेळी, कुलदीप यादवने पाकिस्तानी फलंदाजांवर वर्चस्व राखले. कुलदीपने सलमान आगा (Salman Agha), शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) आणि नसीम शाह (Naseem Shah) यांना बाद केले. (Champions Trophy 2025)

Title : Champions Trophy 2025 Virat Kohlis Century Celebrated in Pakistan 

 

Join WhatsApp Group

Join Now