आज चैत्र अमावस्या! ‘या’ 5 राशींच नशीब चमकणार

On: April 16, 2026 1:28 PM
Chaitra Amavasya 2026
---Advertisement---

Chaitra Amavasya 2026 | हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे आणि चैत्र अमावस्या अत्यंत खास मानली जात आहे. चैत्र अमावस्या (Chaitra Amavasya निमित्त ग्रहांची अनोखी स्थिती निर्माण झाली असून अनेक शुभ योग एकत्र आले आहेत. यामुळे काही राशींना आज विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार आज सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, चंद्र-मंगळ योग आणि गजकेसरी योग असे अनेक शुभ संयोग जुळून आले आहेत. या योगांमध्ये केलेल्या कार्यांना यश मिळण्याची शक्यता जास्त असते. विशेषतः 5 राशींसाठी आजचा दिवस भाग्यवर्धक ठरणार आहे.

‘या’ राशींना मिळणार विशेष लाभ :

वृषभ (Taurus):

आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरू शकतो. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल आणि एखादी मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठीही दिवस अनुकूल आहे, मात्र प्रेमसंबंधात संयम ठेवणे गरजेचे आहे.

कर्क (Cancer):

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. आर्थिक योजना यशस्वी होतील. कामात आत्मविश्वास वाढेल आणि कठीण कामेही सहज पूर्ण होतील. परदेशाशी संबंधित कामांमध्ये लाभ होण्याची शक्यता आहे.

कन्या (Virgo):

कन्या राशीच्या व्यक्तींना आज धनलाभाचे संकेत आहेत. एखादी प्रतीक्षित चांगली बातमी मिळू शकते. कुटुंब आणि जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. भविष्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यास हा दिवस योग्य ठरू शकतो.

Chaitra Amavasya 2026 | करिअर आणि नातेसंबंधात सकारात्मक बदल:

धनु (Sagittarius):

धनु राशीसाठी आजचा दिवस समाधान देणारा असेल. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान वाढेल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. जुन्या समस्या दूर होऊन नव्या संधी मिळू शकतात. कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहील.

कुंभ (Aquarius):

कुंभ राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील आणि एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते.

आजच्या या शुभ योगांमुळे अनेकांना यश, पैसा आणि समाधान मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दिवशी केलेले पूजन, दान आणि महत्त्वाचे निर्णय फायदेशीर ठरू शकतात.

News Title: Chaitra Amavasya 2026: 5 Zodiac Signs to Get Lucky with Sarvartha Siddhi Yoga

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now