Ashok Kharat Case | नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरण आता अधिकच गाजू लागले आहे. एका महिलेच्या तक्रारीवरून अटक झालेल्या खरातच्या कार्यालयातून 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
सुषमा अंधारेंची सोशल मीडियावर टीका :
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत मोठा दावा केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) आणि आरोपी अशोक खरात (Ashok Kharat) यांचा एकत्र फोटो शेअर करत टीका केली आहे.
अंधारे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये असा आरोप केला की, आरोपी अशोक खरात याच्यावर यापूर्वीही लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते. त्या वेळी संबंधित संस्थेकडून माफीनामा घेतला गेला असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच काही राजकीय नेत्यांनी या ज्योतिषाच्या सांगण्यावरून विविध पूजा आणि अघोरी विधी केल्याची चर्चा असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
Ashok Kharat Case | खरातच्या कार्यालयातून 58 आक्षेपार्ह व्हिडिओ :
नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाणे (Sarkarwada Police Station, Nashik) येथे 35 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. तक्रारीनुसार, अशोक खरात (Ashok Kharat) याने धार्मिक विधी किंवा गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीच्या कार्यालयाची झडती घेतली असता एक पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आली. या पेन ड्राइव्हमध्ये 58 आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओंमध्ये अनेक महिलांबरोबरच काही प्रभावशाली व्यक्तींशी संबंधित सामग्री असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण :
या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांच्या तपासात या व्हिडिओंमध्ये नेमके कोणाचे चेहरे किंवा नावे आहेत, याची चौकशी सुरू आहे. काही राजकीय नेते, मंत्री, अधिकारी तसेच सेलिब्रिटींच्या नावांची चर्चा सुरू झाल्याने या प्रकरणाची गंभीरता वाढली आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा तपास नाशिक क्राइम ब्रांच (Nashik Crime Branch) करत असून पुढील चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






