Tech Tips: ब्लॉक न करता बंद होतील फालतूचे कॉल्स, फक्त मोबाईलमधील ‘ही’ सीक्रेट सेटिंग करा चालू

On: March 10, 2026 2:08 PM
Call Blocking Tips
---Advertisement---

Call Blocking Tips | स्मार्टफोन आपल्या दैनंदिन आयुष्याचा महत्त्वाचा भाग झाला आहे. पण कधी कधी काही लोकांचे सतत येणारे फोन कॉल तर कधी Unknown कॉल्स डोकेदुखी बनतात. मग अशा नंबरला ब्लॉक(Call Blocking Tips) करत बसावं लागतं. मात्र मोबाईलमध्ये अशी एक खतरनाक सेटिंग आहे ज्यामुळे असे सतत येणारे कॉल बंदच होतील. हे वाचून तुमची उत्सुकता वाढली असेल की ही सेटिंग नेमकी आहे तरी काय? याविषयी जाणून घेऊया.

फार कमी लोकांना माहीत आहे की स्मार्टफोनमध्ये एक अशी ट्रिक आहे ज्यामुळे नंबर ब्लॉक न करता त्या व्यक्तीचे कॉल टाळता येतात. ही खास ट्रिक म्हणजे “Send to Voicemail” किंवा कॉल थेट व्हॉइसमेलवर पाठवण्याची सुविधा. या फीचरमुळे तुमचा फोन अजिबात वाजत नाही आणि समोरच्या व्यक्तीचा कॉल थेट व्हॉइसमेलवर जातो. त्यामुळे कॉल करणाऱ्याला असे वाटते की तुम्ही नेटवर्कच्या बाहेर आहात किंवा सध्या फोन उचलू शकत नाही.

आजकाल बहुतेक अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये ही सुविधा उपलब्ध (Mobile Settings)आहे. विशेष म्हणजे या पद्धतीत तुम्हाला कोणालाही ब्लॉक करावे लागत नाही. त्यामुळे नातेसंबंध बिघडण्याची शक्यता कमी होते आणि तुमचीही शांतता टिकून राहते.

व्हॉइसमेल म्हणजे काय?
व्हॉइसमेल म्हणजे एखाद्या कॉलला तुम्ही उत्तर देऊ शकत नसाल, तर कॉल करणारी व्यक्ती तुमच्यासाठी आवाजात छोटा संदेश रेकॉर्ड करून ठेवू शकते. नंतर तुम्हाला वेळ मिळाल्यावर तो संदेश ऐकता येतो. ऑफिसमधील कामे, महत्त्वाचे कॉल किंवा व्यस्त वेळेत ही सुविधा खूप उपयोगी ठरते.

ही सेटिंग कशी सुरू कराल?
सर्वप्रथम तुमच्या फोनमधील कॉन्टॅक्ट लिस्ट उघडा आणि ज्या नंबरचे कॉल टाळायचे आहेत तो नंबर निवडा. त्यानंतर स्क्रीनच्या वर दिसणाऱ्या तीन बिंदूंवर (⋮) टॅप करा. तिथे Send to Voicemail किंवा Direct to Voicemail असा पर्याय दिसेल. तो चालू केल्यावर त्या नंबरचे सर्व कॉल थेट व्हॉइसमेलवर जातील.

ही छोटी सेटिंग अनेक त्रासदायक कॉल्सपासून वाचवू शकते. मात्र लक्षात ठेवा की हे फीचर बहुतेक Android फोनमध्ये उपलब्ध असते, तर iOS वापरकर्त्यांना “Silence Unknown Callers” सारखा पर्याय वापरावा लागतो. थोडक्यात, ही स्मार्टफोनची छोटी पण अत्यंत उपयुक्त ट्रिक तुमचा वेळ आणि मानसिक शांतता दोन्ही वाचवू शकते.

Join WhatsApp Group

Join Now