Bus Accident | एक हृदयद्रावक दुर्घटना घडली असून प्रवाशांनी भरलेली एक बस थेट पद्मा नदीत (Padma River) कोसळली आहे. या भीषण अपघातात आतापर्यंत २३ जणांना आपले प्राण गमवावे लागले असून त्यांचे मृतदेह प्रशासनाने बाहेर काढले आहेत.या भीषण अपघातामुळे सगळेच शॉकमध्ये आहे.
ही घटना बांगलादेश (Bangladesh) मध्ये घडली असून प्रवाशांनी भरलेली बस पद्मा नदीत (Padma River) कोसळल्याने मोठी जीवितहानी झाली आहे.आतापर्यंत २३ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोपालगंज (Gopalganj) येथून ढाका (Dhaka) कडे जाणाऱ्या बसमध्ये ५० हून अधिक प्रवासी होते. गुरुवारी सकाळी घाटावरून फेरीवर चढण्याच्या प्रक्रियेदरम्यान बस अचानक घसरली आणि थेट नदीत कोसळली. या घटनेनंतर तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले.
राजबारी (Rajbari) जिल्ह्यातील दौलतदिया फेरी घाट (Daulatdia Ferry Ghat) येथील पॉन्टून ३ वर ही दुर्घटना घडली. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी सुमारे ५:१५ वाजता सौहार्दो परिवहन (Souhardo Paribahan) कंपनीची बस फेरीवर चढत असताना नियंत्रणाबाहेर गेली. त्याचवेळी एका छोट्या सहाय्यक फेरीने पॉन्टूनला धडक दिल्यामुळे परिस्थिती अधिकच बिघडली आणि बस सुमारे ३० फूट खोल पाण्यात बुडाली.
At least 35 passengers are missing after a bus plunged into the Padma River at Daulatdia Ghat, Bangladesh; two bodies have been recovered so far as rescue operations continue.
People live like cockroaches and die like cockroaches
pic.twitter.com/kq6pxbfvrs— Lord Immy Kant (@KantInEastt) March 25, 2026
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना टर्मिनल ३ समोर घडली. बस राजबारीहून ढाक्याकडे जात होती आणि नदी पार करण्यासाठी फेरीचा वापर करत होती. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे बस थेट नदीत पडली, ज्यामुळे प्रवाशांमध्ये भीती आणि गोंधळ उडाला. या अपघाताचे दृश्य काही लोकांनी मोबाईलमध्येही कैद केले आहे. प्राथमिक चौकशीत असे स्पष्ट झाले आहे की, बसचा वेग जास्त होता आणि घाटावरील रस्ता ओला असल्याने चालकाला वाहनावर नियंत्रण ठेवता आले नाही. थांबवण्याचा प्रयत्न करूनही बस पाण्यात कोसळली. सध्या प्रशासनाकडून पुढील तपास सुरू असून बचावकार्य वेगाने सुरू आहे.






