“…त्याला मी ठार केलं”, ब्रिजभूषण सिंह यांच्या कबुलीने देशभरात खळबळ

On: May 9, 2024 7:49 PM
Brij Bhushan Singh Big revelation about Firing case
---Advertisement---

Brij Bhushan Singh | भाजप नेते ब्रिजभूषण सिंह हे गेल्या काही दिवसांपासून एका वादग्रस्त प्रकरणामुळे सतत चर्चेत आहेत. त्यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाचा आरोप ठेवण्यात आला आहे. या आरोपांनंतर भाजपने उत्तर प्रदेशातील कैसरगंज मतदारसंघातून ब्रिजभूषण शरण सिंह यांचा मुलगा करण भूषण यांना उमेदवारी दिली आहे.

आता ब्रिजभूषण यांनी सर्वांत मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी केलेल्या गोळीबाराबद्दल जाहीर कबुली दिली आहे. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ज्या व्यक्तीने माझ्या मित्राला मारले होते, त्या व्यक्तीची मी हत्या केली. असं ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पुढे त्यांनी सांगितलं की, काही जण बोलत आहे की, भाजपने माझ्याकडे दुर्लक्ष केले. पण मी असे मानत नाही, कारण पक्षाने माझ्या मुलाला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पक्ष आमच्यासोबत ताकदीने उभा आहे.

ब्रिजभूषण सिंह यांचं मोठं वक्तव्य

गोळीबाराच्या घटनेवर ब्रिजभूषण शरण सिंह यांनी सांगितलं की, तेव्हा क्रॉस फायरिंग झाली होती. माझ्या मित्राची हत्या करण्यात आली, मग हल्लेखोराला ठार करण्यात आले. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. मी केवळ माझ्या बचावासाठी गोळी चालवली होती. 40 मिनिटे हे सर्वकाही सुरू होतं.

ही घटना घडली तेव्हा मी खासदार नव्हतो. त्यामुळे एखादी घटना घडलीच नाही असं मी म्हणणार नाही आणि मी साधा माणूस आहे असंही सांगणार नाही. जर आमच्या एखाद्या मित्राला मारण्यात आलं असेल तर शांत कसं बसणार?, त्यांना प्रत्युत्तर देणं गरजेचं होतं, नाहीतर त्यांनी इतरांवर देखील हल्ला केला असता, असं ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) म्हणाले आहेत.

“..तर स्वत: फासावर लटकेन”

दरम्यान, महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या आरोपाबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. या प्रकरणात मी निर्दोष सिद्ध होईल. सर्वकाही खोटे नाट्य सुरू आहे. लवकरच सत्य समोर येईल. एका जरी प्रकरणात मी दोषी आढळलो तर स्वत: फासावर लटकेन.”, असं ब्रिजभूषण सिंह यांनी म्हटलंय.

News Title –  Brij Bhushan Singh Big revelation about Firing case

महत्त्वाच्या बातम्या-

अजित पवारांनी खडसावलं, चंद्रकांत पाटलांनी तोंडातून चकार शब्द काढला नाही!

दहावी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!

पुणे हादरलं! पानटपरीवर घडला धक्कादायक प्रकार

संजोग वाघेरे यांना घरातूनच विरोध!, भावकीतील संदीप वाघेरे यांनी दिली तिखट प्रतिक्रिया

‘दीपिका प्रेग्नंट आहे तरी बेबी बंप का दिसेना?’; चाहत्यांना सतावतेय चिंता

Join WhatsApp Group

Join Now