LPG ग्राहकांनो लक्ष द्या! मुंबईत आजपासून लागू झाली ‘ही’ नवी सेवा; जाणून घ्या काय बदलणार?

On: July 19, 2026 12:24 PM
LPG Cylinder
---Advertisement---

LPG Cylinder | घरगुती एलपीजी वापरणाऱ्या ग्राहकांसाठी मोठा दिलासा देणारी नवी सेवा सुरू करण्यात आली आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (Bharat Petroleum Corporation Limited) ‘भारतगॅस लाईट झिप’ ही प्रीमियम एलपीजी सेवा सुरू केली असून, सुरुवातीला तिची अंमलबजावणी मुंबईत करण्यात आली आहे. हलके गॅस सिलिंडर, जलद कनेक्शन आणि वेगवान डिलिव्हरी अशा सुविधा या सेवेत उपलब्ध होणार आहेत. कंपनीच्या माहितीनुसार, 15 ऑगस्ट 2026 पर्यंत ही सेवा देशातील 24 राज्यांतील 100 शहरांमध्ये विस्तारली जाणार आहे.

हलक्या सिलिंडरमुळे ग्राहकांना मोठा दिलासा :

नव्या ‘भारतगॅस लाईट झिप’ सेवेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कंपोझिट एलपीजी सिलिंडर. पारंपरिक स्टीलच्या सिलिंडरच्या तुलनेत हा सिलिंडर वजनाने खूपच हलका असल्यामुळे तो सहज उचलता आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येतो. त्यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच लहान कुटुंबांसाठी ही सुविधा अधिक सोयीची ठरणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

या सिलिंडरची आणखी एक जमेची बाजू म्हणजे त्याला गंज लागत नाही. त्यामुळे देखभालीचा खर्च आणि त्रास कमी होतो. तसेच सिलिंडरच्या बाहेरील पारदर्शक आवरणामुळे ग्राहकांना तो न उघडताच आत किती गॅस शिल्लक आहे, हे सहज पाहता येते. त्यामुळे गॅस संपण्यापूर्वीच त्याचा अंदाज घेऊन वेळेत नवीन सिलिंडरची नोंदणी करता येणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या नव्या डिझाइनमध्ये सुरक्षेलाही विशेष प्राधान्य देण्यात आले असून पारंपरिक सिलिंडरच्या तुलनेत ते अधिक सुरक्षित बनविण्यात आले आहे.

LPG Cylinder | जलद कनेक्शन आणि वेगवान डिलिव्हरीची सुविधा :

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीचा विचार करून (BPCL) ने ही सेवा विकसित केली आहे. याअंतर्गत ग्राहकांना नवीन एलपीजी कनेक्शन मिळण्यासाठी जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही. तसेच सिलिंडरची डिलिव्हरीही पूर्वीपेक्षा अधिक वेगाने करण्यात येणार असल्याने ग्राहकांचा वेळ वाचणार असून सेवा अधिक सुलभ होईल, असा कंपनीचा दावा आहे.

देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्या (Indian Oil) इंडियन ऑईल, (BPCL) भारत पेट्रोलियम आणि (HPCL) हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (Hindustan Petroleum Corporation Limited) या तिन्ही कंपन्या आता हलक्या कंपोझिट सिलिंडर, आधुनिक तंत्रज्ञान आणि जलद वितरण व्यवस्थेवर भर देत आहेत. यामुळे भविष्यात ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा, आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज गॅस सिलिंडर आणि सेवांचे अधिक पर्याय उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

News Title: BPCL Launches BharatGas Lite Zip

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now