BMW Bike l आजकाल तरुणांमध्ये बाईकची क्रेझ आहे. BMW ची नवी बाईक भारतीय बाजारात दाखल झाली आहे. BMW M 1000 XR दमदार फीचर्ससह बाजारात लाँच झाली आहे. BAW च्या M मॉडेलमधील ही तिसरी बाईक आहे. यापूर्वी M 1000 RR आणि M 1000 R भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात आले होते. आता M 1000 XR भारतीय बाजारात आले आहे. BMW ची ही बाईक सर्वात शक्तिशाली मोटरसायकल असल्याचा दावा केला जातो. या बाईकचे इंजिनही जोरदार पॉवरफुल बनवण्यात आले आहे.
BMW M 1000 XR चे डिझाईन कसे असणार? :
BMW M 1000 XR ही S 1000 XR बाईक सारखी आहे. BMW ने या नवीन बाईकची स्टाइल स्पोर्टियर बनवली आहे. या बाईकमध्ये एम विंगलेटचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे तिची हाय-स्पीड स्थिरता आणखी सुधारली आहे. या BMW बाईकमध्ये स्मोक्ड विंडस्क्रीन, स्प्लिट हेडलाइट्स, डे टाईम रनिंग लाइट्सही असेम्बल करण्यात आले आहेत. या बाइकमध्ये दोन नवीन पेंट स्कीम आणि बार-एंड मिरर आहेत. नवीन पेंट स्कीममध्ये ब्लॅक स्टॉर्म मेटॅलिक आणि हलका पांढरा रंग समाविष्ट आहे.
बीएमडब्ल्यूच्या या एम मॉडेलमध्ये कार्बन फायबरचे घटक वापरण्यात आले आहेत. यात बाइकची चाके, इंटिग्रेटेड चेन गार्डसह मागील चाकाचे कव्हर, साइड पॅनेल्स, फ्रंट व्हील कव्हर, इग्निशन कव्हर, इनर कव्हर यासारख्या घटकांचा समावेश आहे. या बाईकच्या वजनाबद्दल बोलायचे झाले तर या बाईकचे वजन 223 किलो आहे.
BMW M 1000 XR चे पॉवरट्रेन कसे असेल :
BMW M 1000 XR मध्ये 999 cc, इनलाइन 4-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन 12,750 rpm वर 201 PS ची शक्ती प्रदान करते आणि 11,000 rpm वर 113 Nm टॉर्क जनरेट करते. या BMW बाईकच्या इंजिनला 6-स्पीड गियर बॉक्स देखील जोडण्यात आला आहे. ही बाईक केवळ 3.2 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडू शकते आणि केवळ 7.4 सेकंदात 200 किमी प्रतितास वेग देखील मिळवू शकते. या बाईकचा टॉप स्पीड 280 kmph आहे.
BMW M 1000 XR मध्ये TPMS, व्हीली कंट्रोल, हीटेड ग्रिप्स, अडॅप्टिव्ह हेडलाइट्स, शिफ्ट असिस्टंट प्रो, पिट लेन लिमिटर, लॉन्च कंट्रोल, एबीएस, स्लाइड कंट्रोल, यूएसबी चार्जिंग सॉकेट, ऑटोमॅटिक हिल स्टार्ट कंट्रोल आणि डायनॅमिक ब्रेक कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. बीएमडब्ल्यूच्या या शानदार बाईकची किंमत खूपच जास्त आहे. BMW ने या नवीन मोटरसायकलची एक्स-शोरूम किंमत 45 लाख रुपये ठेवली आहे.
News Title – BMW M 1000 XR Launch
महत्त्वाच्या बातम्या
…असं करायला उद्धव ठाकरेंना लाज वाटत नाही का? ‘या’ बड्या नेत्यानी काढली ठाकरेंची इज्जत
येत्या काही दिवसांत या राशींच्या व्यक्तींना राजकारणात यश मिळणार
पावसाचं रौद्ररुप! अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल
“…असे लोक पुन्हा निवडून यायला नको”; अण्णा हजारे केजरीवालांवर संतापले






