Public Holiday | मुंबईसह महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून राज्यभरात निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. येत्या गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व २९ महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (BMC Election 2026)
राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग तसेच उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने स्वतंत्र अध्यादेश काढत हा निर्णय घेतला आहे. मतदानाच्या दिवशी कोणत्याही कारणामुळे मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
कोणत्या आस्थापनांना सुट्टी बंधनकारक? :
ही सार्वजनिक सुट्टी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांना लागू राहणार आहे. यामध्ये केंद्र व राज्य शासनाची कार्यालये, सार्वजनिक उपक्रम तसेच निमशासकीय संस्था यांचा समावेश आहे. याशिवाय, सर्व सार्वजनिक व खासगी बँका देखील या दिवशी बंद राहणार आहेत. (January 15 Public Holiday)
फक्त सरकारी यंत्रणाच नव्हे, तर खासगी कंपन्या, आयटी कंपन्या, शॉपिंग मॉल्स, रिटेल स्टोअर्स, कारखाने, दुकाने, हॉटेल्स, खाद्यगृहे आणि औद्योगिक आस्थापनांनाही ही सुट्टी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मुंबईत मतदार असलेले पण कामाच्या निमित्ताने ठाणे, नवी मुंबई किंवा पालघर येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही मतदानासाठी ही सुट्टी लागू राहणार आहे.
Public Holiday | सुट्टी न दिल्यास काय? तक्रार कुठे कराल? :
काही अत्यावश्यक व लोकोपयोगी सेवांमध्ये पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल, तर अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांना किमान २ ते ३ तासांची सशुल्क मतदान सवलत देणे बंधनकारक आहे. मात्र, यासाठी संबंधित आस्थापनांनी प्रशासनाकडून योग्य कारणासह परवानगी घेणे आवश्यक आहे. (BMC Election 2026)
जर एखाद्या आस्थापनेने सुट्टी किंवा मतदानासाठी सवलत देण्यास नकार दिला, तर त्याविरोधात तक्रार करता येणार आहे. यासाठी मुंबई शहर, पूर्व व पश्चिम उपनगरांमध्ये विशेष दक्षता पथके तैनात करण्यात आली असून नागरिक ९१२२-३१५३३१८७ या क्रमांकावर तक्रार नोंदवू शकतात. लोकशाहीच्या या उत्सवात प्रत्येक मतदाराने निर्भयपणे आपला हक्क बजावावा, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी केले आहे. (Voting Day Leave)






