Medha Kulkarni l भाजपमधील दोन वरिष्ठ महिला नेत्यांमधील टोकाचे मतभेद आता खुलेपणाने समोर येत असून, त्यामुळे पक्षांतर्गत मतभेदांवर नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेनंतर भाजपच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आंदोलनावरून पक्षात वादळ उठलं आहे.
चित्रा वाघ यांचं आंदोलनाला समर्थन :
भाजप आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सोशल मीडियावरून महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कृतीचं कौतुक करत त्यांना “शाब्बास!” अशी थेट शाबासकी दिली. वाघ यांच्या या प्रतिक्रियेमुळे महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं.
याच घटनेवर दुसरीकडे, भाजपच्या माजी खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांना पत्र लिहून आंदोलनाच्या पद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “कुठल्यातरी सोम्या गोम्या, अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेणे पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारे आहे.”
मेधा कुलकर्णी यांनी आंदोलनाच्या सभ्य मार्गांचा आग्रह धरत प्रसिद्धीच्या हव्यासापोटी पक्षाच्या नीतीमूल्यांची पायमल्ली होत असल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी पक्ष संघटनेच्या पातळीवर योग्य समज देण्याची जबाबदारीही शहराध्यक्षांवर टाकली. यामुळे पक्षाच्या अंतर्गत शिस्तीवर आणि निर्णय प्रक्रियेवर प्रश्न निर्माण झाले आहेत.
Medha Kulkarni l भाजपमध्ये दोन विचारसरणी? :
या संपूर्ण प्रकरणावरून भाजपमध्ये दोन वेगळ्या विचारसरणी दिसत आहेत – एकीकडे आक्रमकतेच्या बाजूने उभं राहणारं नेतृत्व, आणि दुसरीकडे शिस्त, विचारशील कृती आणि सकारात्मक आंदोलनावर भर देणारे नेते. त्यामुळे “भाजपमध्ये नेमकं चाललंय काय?” असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.
भले शाब्बास ऽऽऽऽमाझ्या रणरागिणींनो …
ज्या डॉक्टरांमुळे दोन चिमुकल्या आईच्या मायेला पोरक्या झाल्या त्या डॉ. घैसासला भाजप महिला मोर्चाच्या रणरागिणींनी चांगलाच धडा शिकवला…
बेरड आणि माणुसकीने मेलेल्या या भूतांना असा हिसका दाखवावाच लागतो. त्या लेकरांची आई तर परत येऊ शकत नाही पण… pic.twitter.com/134caoXpo1
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 4, 2025






