सोलापुरात मोठी राजकीय उलथापालथ! भाजपचा ‘हा’ उमेदवार विजयी

On: February 9, 2026 11:59 AM
Rajya Sabha Election 2026
---Advertisement---

Solapur ZP Result | सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालांनी राज्याचे लक्ष वेधले असून माळशिरस तालुक्यात मोठ्या राजकीय घराण्यांना जबर धक्का बसल्याचे चित्र आहे. भाजपने पारंपरिक प्रभाव असलेल्या मतदारसंघात मुसंडी मारत महत्त्वाचे विजय मिळवले आहेत. खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तम जानकर यांच्या कुटुंबीयांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

माळशिरसमध्ये भाजपची निर्णायक आघाडी :

राज्यभर चर्चेत असलेल्या सोलापूर जिल्हा परिषद निकालांमध्ये माळशिरस तालुक्यात मोठा राजकीय उलटफेर झाला आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairysheel Mohite Patil) यांच्या प्रभावाखाली मानल्या जाणाऱ्या भागात भाजपने विजय मिळवत राजकीय समीकरणे बदलली आहेत. या निकालामुळे मोहिते पाटील गटाला मोठा धक्का बसला असून भाजपने त्यांच्या बालेकिल्ल्यात यश मिळवले आहे.

माळशिरस तालुक्यातील गुरसाळे गणातून अर्जुनसिंह मोहिते पाटील (Arjunsingh Mohite Patil) यांचाही पराभव झाला आहे. या निकालामुळे मोहिते पाटील कुटुंबाला एकाच वेळी अनेक ठिकाणी अपयशाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे या भागात भाजपचा प्रभाव वाढत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या तालुक्यातील निकाल भविष्यातील स्थानिक समीकरणांवर परिणाम करणारे ठरणार असल्याचे निरीक्षकांचे मत आहे.

Solapur ZP Result | दहिगाव गटात संस्कृती सातपुते यांचा दणदणीत विजय :

दहिगाव जिल्हा परिषद गटात झालेल्या हाय व्होल्टेज लढतीत भाजपच्या संस्कृती सातपुते (Sanskruti Satpute) यांनी बाजी मारली आहे. त्या आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांच्या पत्नी असून त्यांनी शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर (Uttamrao Jankar) यांचे पुत्र जीवन जानकर (Jeevan Jankar) यांचा पराभव केला. या विजयामुळे भाजपने या मतदारसंघात आपली पकड मजबूत केल्याचे स्पष्ट झाले आहे.

इतकेच नव्हे तर दहिगाव जिल्हा परिषद गटातील दोन्ही पंचायत समित्यांवरही भाजपने विजय मिळवला आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसरात भाजपचा प्रभाव अधिक बळकट झाल्याचे दिसून येत आहे. उत्तम जानकर यांच्या पुत्राचा पराभव झाल्याने त्यांच्या राजकीय भवितव्यालाही धक्का बसल्याचे बोलले जात आहे. माळशिरस तालुक्यातील या निकालांनी सोलापूर जिल्ह्यातील राजकीय चित्र बदलले असून आगामी स्थानिक आणि विधानसभा निवडणुकांवर याचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

News Title: BJP Stuns Solapur ZP Race

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now