“काँग्रेसचे नेते भाजपमध्ये आले तरी…”, चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य!

On: May 5, 2025 7:58 PM
Chandrashekhar bawankule
---Advertisement---

Chandrashekhar Bawankule | भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पुणे (Pune) येथील पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केले. काँग्रेस (Congress) नेते भाजपमध्ये आले तरी पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी चिंता करू नये, संधी देताना पहिला विचार तुमचाच केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. पुण्यातील नवनियुक्त मंडल अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारीत प्राधान्य-

बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी कार्यकर्त्यांना धीर देताना सांगितले की, “काँग्रेस हा आपला मुख्य शत्रू आहे. त्यांचे जास्तीत जास्त नेते आणि कार्यकर्ते आपल्या पक्षात आणा. ते आल्यामुळे आपले काय होईल, याची काळजी करू नका.” उमेदवारी देताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पिढीतील निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच प्रथम संधी दिली जाईल आणि त्यानंतरच इतरांचा विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

भोर (Bhor) येथील काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopate) यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांमधील संभाव्य अस्वस्थता लक्षात घेऊन हे विधान केले. “इतर कोणी पक्षात आल्यामुळे कार्यकर्त्यांनी अस्वस्थ होण्याची गरज नाही, आम्ही तुमच्यासाठी आहोत,” असे (Chandrashekhar Bawankule) ते म्हणाले. या बैठकीला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol), उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) उपस्थित होते.

समित्या-महामंडळांवरील नियुक्त्या लवकरच-

राज्यभरातील विविध शासकीय समित्या आणि महामंडळांवरील नियुक्त्या लवकरच केल्या जातील, अशी माहितीही बावनकुळे यांनी दिली. जिल्हा नियोजन समित्यांपासून ते महामंडळांपर्यंत सुमारे १४ ते १५ हजार जागांवर नियुक्त्या होणार असल्याचे त्यांनी सांगितले. वरिष्ठ नेत्यांशी याबाबत चर्चा झाली असून महायुती (Mahayuti) अंतर्गत जागावाटपही निश्चित झाले आहे.

या नियुक्त्यांची प्रक्रिया पुढील दोन महिन्यांत चंद्रकांत पाटील यांच्याकडून पूर्ण केली जाईल, असे बावनकुळे यांनी नमूद केले. या कार्यक्रमादरम्यान पुण्यातील नवनियुक्त मंडल अध्यक्षांचा सत्कारही करण्यात आला.

News Title – BJP Loyalists First Priority says Chandrashekhar Bawankule

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now