Maharashtra l विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांना उमेदवारी मिळाली आहे. मात्र अद्यापही नवाब मलिक यांना उमेदवारी मिळालेली नाही. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. मात्र आता नवाब मलिकांसंदर्भात भाजपच्या एका बड्या नेत्यानं थेट भूमिकाच जाहीर केली आहे.
नबाव मलिक यांचे काम भाजप करणार नाही :
गेल्या काही दिवसांपूर्वी आमदार नवाब मलिक यांच्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मोठे वाद झाले होते. कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर नवाब मलिकांना राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात घेऊ नका या आशयाचं पत्र अजित पवारांना लिहिलं होतं. मात्र तेव्हापासून नवाब मलिक हा दोन्ही घटकपक्षांमधील मतभेदाचाच सर्वात मोठा मुद्दा राहिला आहे.
मात्र आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील अजित पवार यांना नवाब मलिक यांना उमेदवारी द्यायची होती. पण नवाब मलिक यांच्यावरच्या दाऊद कनेक्शनच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षाने त्यावर तीव्र आक्षेप घेतला होता. अशातच आता नबाव मलिक यांचे काम भाजप करणार नाहीत असे भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी थेट स्पष्टपणे सांगितले आहे.
Maharashtra l सना मलिक यांना उमेदवारी :
यावेळी भाजप नेते आशिष शेलार म्हणाले की, दाऊदशी संबंधित असलेल्या नवाब मलिक यांचे काम भाजप कार्यकर्ते देखील करणाार नसल्याची आमची भूमिका ठाम असल्याचं शेलार म्हणाले आहेत. मात्र या सर्व घडामोडींवर पर्याय म्हणूनच आता नवाब मलिकांच्या कन्या सना मलिक यांना अजित पवार यांनी पूर्व मुंबईतील अणुशक्तीनगर मतदारसंघातून थेट तिकीट दिलं आहे.
याशिवाय सना मलिक यांना आज सकाळी एबी फॉर्म देखील दिला आहे. त्यामुळे सना मलिक यांच्यावर कुठलाही आरोप विरोधकांना करता येणार नाही असा तर्क अजित पवारांनी मांडला असावा.
News Title – BJP aginst on nawab malik
महत्त्वाच्या बातम्या-
फडणवीसांची एकूण संपत्ती किती? आकडा पाहून व्हाल थक्क
“सुजय मेलेल्या आईचं दूध प्यायलेला नाही, जशास तसं उत्तर देईल”; शालिनीताई विखे संतापल्या
देवेंद्र फडणवीस सलग सहाव्यांदा विजयी होणार का?
कॉँग्रेसची दुसरी यादी जाहीर, 23 जणांना मिळालं विधानसभेचं तिकीट






