Bigg Boss Marathi 6 Finale | लोकप्रिय रिअॅलिटी शो (Bigg Boss Marathi 6) आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे आणि प्रेक्षकांमध्ये विजेत्याबद्दलची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. घरातील टास्क, वाद, मैत्री आणि भावनिक क्षणांमुळे हा सीझन विशेष चर्चेत राहिला. जवळपास 70 दिवस पूर्ण झाल्यानंतर आता फक्त शेवटचे काही आठवडे उरले आहेत आणि ग्रँड फिनालेची संभाव्य तारीखही समोर आली आहे.
टॉप 10 स्पर्धकांमध्ये रंगली स्पर्धा :
सध्या (Bigg Boss Marathi 6) च्या घरात अंतिम टप्प्यात पोहोचलेले 10 स्पर्धक जोरदार खेळ दाखवत आहेत. या यादीमध्ये विशाल कोटीयन, तन्वी कोलते, अनुश्री माने, राकेश बापट, प्रभू, दिपाली सय्यद, रेवा कौरसे, संकेत पाठक, राखी सावंत आणि सागर कारंडे यांचा समावेश आहे. प्रत्येक स्पर्धक आपापल्या शैलीत खेळ करत असल्यामुळे घरातील वातावरण अधिक रंगतदार झाले आहे.
काही स्पर्धक टास्कमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहेत, तर काहींच्या स्वभावामुळे किंवा रणनीतीमुळे ते प्रेक्षकांच्या चर्चेत आहेत. टॉप 10 स्पर्धकांची यादी निश्चित झाल्यानंतर आता विजेता कोण ठरणार यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. चाहत्यांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धकांना पाठिंबा मिळताना दिसत आहे. (Bigg Boss Marathi Contestants)
Bigg Boss Marathi 6 Finale | फॅमिली वीकमध्ये उलगडली फिनालेची तारीख :
दरम्यान शोमध्ये सध्या फॅमिली वीक सुरू आहे, ज्यामध्ये स्पर्धकांच्या कुटुंबीयांनी घरात येऊन त्यांना भेट दिली. या भेटींमुळे घरात अनेक भावनिक क्षण पाहायला मिळाले. विशेषतः वाइल्ड कार्ड स्पर्धक संकेत पाठक याची पत्नी आणि अभिनेत्री सुपर्ण श्याम घरात आल्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधले गेले. (Bigg Boss Marathi 6 Finale)
घरातून बाहेर जाताना सुपर्णा श्यामने संकेत Pathak ला मिठी मारत “आपण 19 एप्रिलला भेटू” असे सांगितले. या एका वाक्यातूनच शोच्या ग्रँड फिनालेची तारीख 19 एप्रिल 2026 असल्याचे संकेत मिळाले. मात्र याबाबत कलर्स मराठी वाहिनीकडून अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. तरीही या संभाव्य तारखेने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणखी वाढली असून आता सर्वांचे लक्ष ग्रँड फिनालेकडे लागले आहे.






