Prakash Ambedkar | भाजपने काँग्रेसला अनेक मोठे धक्के दिले आहेत. पक्षातील बड्या नेत्यांना भाजपने गळाला लावलंय. काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपत प्रवेश केला. तर आता लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचा एक बडा नेता भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एक दावा करत महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडवली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे भाजपच्या वाटेवर असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
त्यांनी सोलापूरच्या एका सभेत हा गौप्यस्फोट केला आहे. इतकंच नाही तर महाविकास आघाडीच्या सोलापूरच्या उमेदवार प्रणिती शिंदे या देखील निवडणुकीनंतर भाजपमध्ये जाणार असल्याचं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
“सोलापूरच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम मतदार निर्णायक आहेत. तुम्हीच निर्णय करायचा आहे की भाजपला जिंकून द्यायचं की हरवायचं? अनेक मौलवी आज काँग्रेस काँग्रेस करतायेत. त्यांनी विचारावं की देशभरात एकही मुस्लिम उमेदवार का दिला नाही? भाजपची जी लाईन आहे त्यावरच काँग्रेस जात आहे,” असं प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणालेत.
तसंच पुढे ते म्हणाले की, ” सुशीलकुमार शिंदे यांची चौकशी लागलेली आहे. ही चौकशी थांबवण्यासाठी शिंदे भाजपमध्ये जातील. संविधान बदलेल अमुक बदलेल याच्याशी त्यांना काही देणे घेणे नाही. त्यांनी जमवलेली माया वाचवणे एवढेच त्यांचे टार्गेट आहे. निवडणूक झाली की, सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे हे भाजपत प्रवेश करतील.”, असा दावाच प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.
निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे या सोलापुरात कॉँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. अशात या दाव्याची राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.
प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा
दरम्यान, सोलापूरच्या सभेत आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली. मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या काळ्याकुट्ट काळात देशावरील कर्जाचं प्रमाण प्रचंड वाढले आहे. मोदींच्या काळात तब्बल 17 लाख हिंदू कुटुंबांनी भारताचे नागरिकत्व नाकारले आहे आणि ते सर्व परदेशात स्थायिक झाले आहेत. परदेशात स्थायिक झालेल्या हिंदू कुटुंबांकडे केलेल्या मागण्या पूर्ण करता येत नाहीत म्हणून त्यांना धमकावलं जात आहे, असंही प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले आहेत.
News Title – Big secret explosion of Prakash Ambedkar
महत्त्वाच्या बातम्या-
स्वप्नांचा चक्काचूर; T20 World Cup मध्ये ‘या’ खेळाडूला डच्चू, वडिलांनी व्यक्त केली नाराजी
“मला लॉक केलं आणि कपडे काढून…”, अभिनेत्रीच्या आरोपाने खळबळ
महत्वाची बातमी! आरोग्य विमा घेणाऱ्यांना आणखी एक मोठा धक्का
सुनेत्रा पवार यांच्या अडचणीत वाढ, निवडणूक आयोगाने बजावली नोटीस
सुषमा अंधारेंचं हेलिकॅाप्टर कोसळलं, काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ आला समोर






