‘…नाहीतर मी मुख्यमंत्री झालो असतो’; छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

On: May 19, 2024 3:02 PM
OBC Mahaelgar Morcha
---Advertisement---

Chhagan Bhujbal | 2004 मध्ये छगन भुजबळ यांना मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर पक्ष फुटला असता, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी केलं. शरद पवारांच्या या वक्तव्यावर आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळांनी पवारांच्या वक्तव्याचा चांगलात समाचार घेतला आहे. शरद पवार यांच्यासोबत गेलो नसतो तर राज्याचा मुख्यमंत्री झालो असतो. काँग्रेसकडून आपणास तसं सांगण्यात आलं होतं, असा दावा छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला आहे.

1999 मध्ये काँग्रेसमधून शरद पवार बाहेर पडले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. मी शरद पवार यांच्यासोबत गेलो. त्यावेळी काँग्रेसने मला शरद पवार यांच्यासोबत जाऊ नये म्हणून सांगितले. तुम्हाला मुख्यमंत्रीपद देऊ, असंही सांगण्यात आलं. परंतु मी पवार साहेबांची साथ दिली. त्यावेळी मी पवार साहेबांबरोबर गेलो नसतो तर मुख्यमंत्री झालो असतो, असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले.

2004 मध्ये आम्हाला जास्त जागा असल्याने काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री पद देण्याची तयार होती. आम्ही तयार होतो पण पवार साहेब बोलत नव्हते, ते नाव घेत नव्हते. त्यांना काय अडचण होती माहीत नाही, असं भुजबळ यांनी म्हटलंय.

संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव शिवसेनाचा होतो. त्यासाठी त्यांची गटनेतेपदी निवड केली होती. परंतु आधी भाजपने नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने हा प्रस्ताव फेटाळल्याचं म्हटलं आहे. त्यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, आपणास हे माहीत नाही. सर्व चर्चेत उच्चस्तरीय नेते सहभागी होतात, असं भुजबळ म्हणालेत.

शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव शिवसेनाचा होतो. त्यासाठी त्यांची गटनेतेपदी निवड केली होती. परंतु आधी भाजपने नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने हा प्रस्ताव फेटाळल्याचं म्हटलंय आहे. त्यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, आपणास हे माहित नाही. सर्व चर्चेत उच्चस्तरीय नेते सहभागी होतात, असं भुजबळ म्हणालेत.

जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. त्या सभेला प्रचंड गर्दी होती. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा झाली. ती सभाही प्रचंड मोठी होती. आता सर्व नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा, असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

पुणे हादरलं! बड्या उद्योगपतीच्या 17 वर्षाच्या मुलाने भरधाव कारने दोघांना चिरडलं

जान्हवी कपूरने सांगितली धक्कादायक घटना; संपूर्ण बॉलिवूड हादरलं

‘अशा’ व्यक्तींपासून होईल तितकं दूर राहा; आयुष्यात खूप पुढे जाल

“सगळी पदं दिली, आणखी काय हवं होतं?”, शरद पवारांचं अजित पवारांना उत्तर

“बंधुराज कुठल्या पातळीला जाऊ शकतात हे तुम्हाला माहित नसेल”

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now