देशाच्या राजकारणात मोठा भूकंप! ‘या’ दिवशी मराठी माणूस पंतप्रधान होणार?

On: December 14, 2025 11:24 AM
narendra modi
---Advertisement---

Marathi Prime Minister | देशाच्या राजकारणात 19 डिसेंबर रोजी मोठी उलथापालथ होणार असल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्यांच्या मते देशाचा पंतप्रधान बदलू शकतो आणि पंतप्रधानपदी मराठी माणूस विराजमान होईल. पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हा दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. विशेष म्हणजे याच महिन्यात त्यांनी दुसऱ्यांदा हा अंदाज व्यक्त केला असून, त्यामागे आंतरराष्ट्रीय घडामोडींचा संदर्भ दिला आहे. (Marathi Prime Minister)

पृथ्वीराज चव्हाण यांनी दीर्घकाळ पंतप्रधान कार्यालयात (PMO) काम केले असल्याने दिल्लीतील राजकीय हालचालींची त्यांना सखोल माहिती असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंमध्ये चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या दाव्याला ठोस आधार नसल्याचे सांगत भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.

पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले? :

पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavan) यांनी सांगितले की 19 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो, ज्याचे पडसाद भारतातही उमटू शकतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेत एका व्यक्तीने काही बड्या नेत्यांवर स्टिंग ऑपरेशन केल्याची माहिती समोर येणार आहे. या स्टिंगमधून अनेक दिग्गजांची नावे जाहीर होणार असून, त्यामुळे अमेरिकेत मोठे राजकीय संकट निर्माण होईल. या पार्श्वभूमीवर भारतातही राजकीय परिणाम संभवतात आणि कदाचित पंतप्रधान बदल होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.

याआधी सांगलीतील पत्रकार परिषदेतही त्यांनी मराठी माणूस लवकरच पंतप्रधानपदी दिसेल, असे विधान केले होते. यावेळी त्यांनी अमेरिकेतील राजकीय घडामोडींचा संदर्भ देत आपल्या दाव्याची पुनरावृत्ती केली. विशेषतः जेफ्री एपस्टाईन प्रकरणातील कागदपत्रे आणि त्यावरून सुरू असलेल्या वादामुळे अमेरिकेत राजकीय वादळ उठल्याचे त्यांनी नमूद केले.

Marathi Prime Minister | भाजपची प्रतिक्रिया आणि राजकीय वाद :

पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यावर भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. अमेरिकेतील कथित कागदपत्रांआधारे भारताचा पंतप्रधान कसा बदलू शकतो, असा सवाल भाजप नेत्यांनी उपस्थित केला आहे. हा दावा पूर्णपणे निराधार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या विरोधात मुद्दाम पसरवला जात असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. तसेच, गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय कट रचल्याचा आरोपही सत्ताधारी नेत्यांकडून केला जात आहे.

दरम्यान, या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना वेग आला असून 19 डिसेंबरकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा दावा केवळ राजकीय अंदाज ठरेल की प्रत्यक्षात काही घडामोडी घडतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

News Title: Big Political Earthquake on December 19? Congress Leader Claims Marathi Person May Become Prime Minister

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now