राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर सर्वात मोठा दावा; मोदी-शाहांच्या ग्रीन सिग्नलची चर्चा!

On: February 3, 2026 11:21 AM
Sharad Pawar
---Advertisement---

Sharad Pawar | अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत अत्यंत मोठा दावा समोर आला आहे. राज्यातील एका ज्येष्ठ नेत्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा )Amit Shah) यांची नावे घेत या संभाव्य विलिनीकरणाबाबत मोठा खुलासा केला आहे.

या नेत्याच्या दाव्यानुसार, शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात एकत्र येण्याबाबत गंभीर चर्चा सुरू होती. एवढेच नाही तर या प्रक्रियेसाठी केंद्रातील सर्वोच्च नेतृत्वाकडूनही हिरवा कंदील मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

12 फेब्रुवारीला होणार होती घोषणा? :

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या एकत्रीकरणाबाबतची घोषणा 12 फेब्रुवारीला होणार होती. जयंत पाटील आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात या विषयावर चर्चा सुरू होती, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र त्यानंतर अजित पवार गटातील काही नेत्यांनी याबाबत थेट नकार दिला होता.

तरीही आता समोर आलेल्या नव्या दाव्यांमुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. संबंधित नेत्याने सांगितले की, जर परिस्थिती बदलली नसती तर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे औपचारिक विलिनीकरण लवकरच जाहीर झाले असते आणि त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम झाला असता.

Sharad Pawar | सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्याबाबतही मोठा खुलासा :

या दाव्यानुसार, संभाव्य विलिनीकरणानंतर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची केंद्रात महत्त्वाची भूमिका ठरवण्यात येणार होती, तर राज्यात नेतृत्वाची जबाबदारी अजित पवारांकडे राहणार होती. तसेच अमोल कोल्हे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती होणार असल्याचाही दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेल्या नसल्या तरी, या वक्तव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सुरू झालेल्या राजकीय उलथापालथीत राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य कोणत्या दिशेने जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

News Title: Big Claim on NCP Merger: Narendra Modi and Amit Shah’s Green Signal Alleged

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now