GST 2.0 | भारतात २०१७ मध्ये जीएसटी (GST) लागू झाला होता. मात्र गेला काही वर्षात त्याच्या अनेक स्लॅब्समुळे कर रचना कठीण झाली होती, आणि त्यामुळेच सामान्य नागरिकांवर आणि व्यापाऱ्यांवर वर त्याचा ताण वाढत होता. ही पार्श्वभूमी लक्षात घेता केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या चर्चेनंतर कर प्रणाली अधिक सोपी करण्यासाठी जीएसटी (GST२.०) आणण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यामुळे कराचे दर कमी करून स्लॅबमध्ये विभागले जातील आणि अनेक वस्तूंवरचा भार हलका होईल.
या जीएसटी (GST२.०) मुळे भारताच्या कर प्रणालीमध्ये मोठा बदल घडला आहे. २२ सप्टेंबर पासून जीएसटी (GST) २.० लागू झाला आहे आणि त्यामुळे वस्तू आणि सेवांवरील कर रचना अधिक सोपी झाली आहे. जीएसटी (GST) परिषदेच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. नव्या धोरणेनुसार कराचे फक्त दोन स्लॅब करण्यात आले आहेत जे की ५% आणि १८% असतील. तसेच तंबाखू, दारू, पान मसाला आणि एरेटेड ड्रिंक्स वर ४०% इतकाच ‘सीन टॅक्स’ लागू राहणार आहे.
काय होणार स्वस्त होणार?
या २.० जीएसटी (GST) मुळे दैनंदिन वापरातील अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. जसं की टूथपेस्ट, साबण, शाम्पू, बिस्किट, तूप आणि दुग्ध पदार्थांवरील कर १२% वरून ५% होणार आहे. सायकल आणि स्टेशनरी ही कमी दरात उपलब्ध होतील. कपडे व चपला सुद्धा काही किमती पर्यंत स्वस्त मिळणार आहेत. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एसी, फ्रिज, एलईडी टीव्ही स्वस्त होतील. तसेच सिमेंटचे दरही कमी झाले असून घर बांधकाम करणाऱ्यांनाही दिलासा मिळेल. छोट्या कार आणि टू व्हीलरवरील कर २८% वरून १८% झाला आहे.
‘या’ वस्तूंवरील कर कायम
दुसरीकडे, तंबाखू उत्पादने दारू, पान मसाला, ऑनलाईन गेम यावरचा कर कायम राहणार आहे. पेट्रोल डिझेल जीएसटी मध्ये नसल्याने त्यामध्ये कोणतेही बदल होणार नाहीत. हिरे आणि मौल्यवान गोष्टींवर जीएसटी लागू राहील. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत असला तरी, लक्झरी वस्तूंवरील खर्च मात्र वाढलेलाच राहणार.
सरकारच्या मते या बदलामुळे बाजारातील खरेदी विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे. सामान्य नागरिकांना जीएसटीमध्ये दिलासा मिळाला तर वस्तूंची मागणी वाढेल आणि अर्थव्यवस्थेला ही चालना मिळेल. सरकारचा दावा आहे की जीएसटी (GST) २.० मुळे कर प्रणाली अधिक पारदर्शक होईल आणि महसूल व्यवस्थापना सुधारेल.






