लोणावळ्याला फिरायला जाण्याचा विचार करताय? तर ‘ही’ बातमी नक्की वाचा

On: July 3, 2026 12:54 PM
Bhushi Dam
---Advertisement---

Bhushi Dam | पावसाळ्याची चाहूल लागताच निसर्गप्रेमी आणि पर्यटक वर्षाविहाराचे नियोजन करू लागतात. विशेषतः मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) परिसरातील नागरिकांची पसंती लोणावळा (Lonavala) आणि भुशी धरणाकडे (Bhushi Dam) असते. यंदा जुलैच्या सुरुवातीलाच दमदार पावसामुळे भुशी धरण ओव्हरफ्लो झाले असून परिसरातील निसर्गसौंदर्य खुलून आले आहे. यंदाच्या पावसातील येथील पहिले आकर्षक दृश्यही समोर आले आहेत.

वर्षाविहारासाठी भुशी धरण पुन्हा सज्ज :

पावसाळा सुरू होताच अनेकजण खासगी रिसॉर्टमध्ये मुक्काम करण्याचा पर्याय निवडतात, तर काही जण हिरव्यागार डोंगररांगा, धबधबे आणि नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी प्रसिद्ध पर्यटनस्थळांकडे धाव घेतात. मुंबई आणि पुणे परिसरातील पर्यटकांसाठी बदलापूर (Badlapur), कर्जत (Karjat), माथेरान (Matheran) आणि लोणावळा ही ठिकाणे नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिली आहेत. विशेषतः आठवड्याच्या सुट्टीत या भागांमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.

दरवर्षी पावसाळ्यात कर्जत, खोपोली (Khopoli), कसारा (Kasara), माथेरान आणि बदलापूरसह अनेक पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी रेलचेल असते. मात्र या सर्वांमध्ये भुशी धरण हे वर्षाविहारासाठी सर्वाधिक पसंतीचे ठिकाण मानले जाते. लोणावळ्यातील या धरणाच्या पायऱ्यांवर बसून कोसळणाऱ्या पावसाचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक येथे येतात. धरण परिसरातील हिरवागार निसर्ग, वाहणारे पाणी आणि डोंगररांगांचे मोहक दृश्य पर्यटकांना अविस्मरणीय अनुभव देतात.

Bhushi Dam | दमदार पावसाने खुलले धरणाचे सौंदर्य :

यंदा महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सूनचे आगमन अपेक्षेपेक्षा उशिरा झाले असले तरी जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. लोणावळा-खंडाळा (Khandala) परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे वर्षाविहाराचा हंगाम आता खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे. सततच्या पावसामुळे परिसरातील धबधबे आणि नैसर्गिक स्थळे पुन्हा एकदा पर्यटकांनी गजबजू लागली आहेत.

अवघ्या 48 तासांत 229 मिमी पावसाची नोंद झाल्यानंतर पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेले भुशी धरण पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाच्या सांडव्यावरून फेसाळत वाहणाऱ्या पाण्यामुळे परिसराचे सौंदर्य अधिकच खुलले असून पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदाच्या पावसातील भुशी धरणाची पहिली मनमोहक दृश्ये समोर आल्यानंतर अनेकजण आता येथे वर्षाविहाराचे नियोजन करू लागले आहेत.

News Title: Bhushi Dam Overflows After Heavy Rain

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now