भीमाशंकरला जाणाऱ्या भाविकांसाठी गूड न्यूज! आता ‘या’ वेळेत थेट दर्शन घेता येणार

On: June 18, 2026 5:49 PM
Bhimashankar Temple
---Advertisement---

Bhimashankar Temple | बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर (Bhimashankar) येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाचा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. भीमाशंकर मंदिर प्रशासनाने ऑनलाइन पास बुकिंगची अनिवार्यता काही प्रमाणात शिथिल केली असून आता ठरावीक वेळेत भाविकांना कोणत्याही पूर्वनोंदणीशिवाय थेट दर्शन घेता येणार आहे. या निर्णयामुळे दूरदूरवरून येणाऱ्या शिवभक्तांची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

दर्शनासाठी नवी वेळ निश्चित :

भाविकांची वाढती संख्या आणि गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने काही दिवसांपूर्वी ऑनलाइन पास बुकिंग प्रणाली सुरू केली होती. मात्र, या व्यवस्थेमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. देशभरातून दर्शनासाठी येणाऱ्या अनेक भाविकांना वेळेवर पास उपलब्ध होत नसल्याने त्यांना निराश होऊन परत जावे लागत होते.

या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने सकाळी 7 ते 11 या कालावधीत येणाऱ्या सर्व भाविकांसाठी थेट दर्शनाची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. या चार तासांच्या कालावधीत ऑनलाइन बुकिंगशिवाय दर्शन घेता येणार असल्याने भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Bhimashankar Temple | कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तयारी :

नाशिक (Nashik) येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) तयारीला प्रशासनाने आतापासूनच सुरुवात केली आहे. प्रयागराज (Prayagraj) येथे झालेल्या महाकुंभ 2025 च्या अनुभवाच्या आधारे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे येणाऱ्या भाविकांपैकी मोठ्या संख्येने श्रद्धाळू भीमाशंकरला भेट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संभाव्य गर्दीचा विचार करून भीमाशंकर देवस्थान ट्रस्टने नवीन सभामंडप आणि पायरी मार्ग उभारण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले आहे. या कामासाठी 9 जानेवारीपासून मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते आणि त्यानंतर ही मुदत 31 मेपर्यंत वाढवण्यात आली होती. साधारणपणे एक वर्ष लागणारे हे काम भिमाशंकर संस्थान, स्थानिक ग्रामस्थ आणि भाविकांच्या सहकार्यामुळे अवघ्या पाच महिन्यांत पूर्ण करण्यात आले. नव्याने उभारण्यात आलेल्या सुविधांमुळे आणि ऑनलाइन पासची सक्ती शिथिल झाल्याने भाविकांचा दर्शनाचा अनुभव अधिक सुलभ होणार आहे.

News Title: Bhimashankar Darshan New Timings

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now