होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई!

On: May 18, 2024 2:01 PM
Bhavesh Bhinde
---Advertisement---

Bhavesh Bhinde | गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस धिंगाणा घालत आहे. त्यामुळे मोठं नुकसान झाल्याचं समजतंय. घाटकोपरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. एक मोठं होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळल्याने पेट्रोल पंप जमीनदोस्त झालं. त्यामध्ये तब्बल 100 लोकं अडकली होती. यामध्ये 14 लोकांचा मृत्यू झाला. ज्या कंपनीचं होर्डिंग होतं त्या कंपनीचे मालक भावेश भिंडे (Bhavesh Bhinde) यांना उदयपूरमधून अटक करण्यात असल्याची माहिती समोर आली आहे.

भावेश भिंडेच्या कंपनीच्या होर्डिंगने दुर्घटना

हे होर्डिंग 120×120 आकाराचं होतं. भावेश भिंडेच्या (Bhavesh Bhinde) कंपनीचं नाव हे इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड असं होतं. घाटकोपरमध्ये छेडानगर परिसरात पेट्रेल पंपाच्या बाजूला अनधिकृत भव्य मोठं होर्डिंग उभारलं होतं. मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी नसतानाही ते होर्डिंग उभारण्यात आलं आहे. त्यानंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने ते होर्डिंग जमीनीकडे झुकलं आणि खाली असलेल्या पेट्रोलपंपवर कोसळलं.

एनडीआरएफची टीम, अग्निशमन दलाचे जवान त्या ठिकाणी बाचव कार्याचं काम करत होते. तेव्हा महापालिकेचे बचाव कार्य पथक देखील त्याठिकाणी उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी ढिगाऱ्याखालून 85 लोकांना बाहेर काढण्याचं काम केलं आहे. सुरूवातीला 14 जण मृत्युमुखी झाल्याचं समजलं होतं. त्यानंतर मृत्युमुखीचा आकडा हा 16 जणांवर गेल्याचं समजतंय. तसेच 66 जणांवर राजावाडी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

भावेश भिंडे पोलिसांच्या जाळ्यात

याच एका होर्डिंगमुळे घाटकोपरमध्ये अनर्थ झाला आहे. लोकसभा निवडणूक पाहता आता याप्रकरणाला राजकीय रंग देखील प्राप्त झाल्याचं दिसलं. दरम्यान, काही दिवसांपासून होर्डिंग लावलेल्या कंपनीचे मालक भावेश भिंडे (Bhavesh Bhinde) हे फरार होते अशी माहिती समोर आली होती. मात्र आता भावेश पोलिसांच्या हाती सापडला असून त्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्याची माहिती समोर आली आहे.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात भावेश भिंडे (Bhavesh Bhinde) यांना उदयपूर येथून अटक करण्यात आली. मुंबई गुन्हेशाखेने भावेशच्या मुसक्या आवळल्या आहेत. भावेश भिंडेला पुढील कारवाईसाठी मुंबईत आणलं जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी मृतकांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती. तर या घटनेला दोषी ठरणाऱ्या आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली होती.

News Title – Bhavesh Bhinde Arrested From Udaypur

महत्त्वाच्या बातम्या

दोन लाख रुपये घे आणि अर्ज मागे घे, शिंदे गटाने दिली ‘या’ उमेदवाराला खुली ऑफर

ग्राहकांनो सराफ दुकानात जाण्याआधी ही बातमी वाचा! जाणून घ्या सोने, चांदीचे आजचे दर

एकनाथ शिंदे गटाला सर्वात मोठा झटका; ‘या’ बड्या नेत्यानी दिला तडकाफडकी राजीनामा

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; राज्यात ‘या’ दिवशी मान्सून दाखल होणार

या राशीच्या व्यक्तींनी प्रवासात काळजी घ्यावी

Join WhatsApp Group

Join Now