भास्कर जाधव ढसाढसा रडले, कारण ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

On: May 1, 2025 8:24 PM
bhaskar jadhav
---Advertisement---

Bhaskar Jadhav | आपल्या रोकठोक आणि आक्रमक राजकीय शैलीसाठी परिचित असलेले आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांचा एक अत्यंत हळवा आणि पितृत्वाची भावना जपणारा पैलू नुकताच गुहागर (Guhagar) तालुक्यातील पांगारी (Pangari) गावात अनुभवायला मिळाला. त्यांच्या घरी गेली आठ वर्षे घरकाम करणाऱ्या सुप्रिया पाटील (Supriya Patil) हिच्या विवाह सोहळ्यात जाधव कुटुंबाने तिला केवळ आशीर्वादच दिले नाहीत, तर पित्याच्या मायेने तिची पाठवणीही केली.

जाधव कुटुंबाची लग्नाला उपस्थिती-

सुप्रिया पाटील हिचा विवाह निश्चित झाल्यानंतर, आमदार भास्कर जाधव यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम बाजूला ठेवून पत्नी सुवर्णा (Suvarna), मुले, सून स्वरा (Swara) आणि पुतण्यांसह पांगारी गावातील सडेवाडी (Sadewadi) येथे आवर्जून उपस्थिती लावली. जाधव कुटुंबाने या सोहळ्यात यजमानाची भूमिका बजावली. विवाहाचे सात फेरे (Saat Phere) पूर्ण झाल्यानंतर, निरोपाच्या वेळी सुप्रियाला आशीर्वाद देताना आमदार जाधव यांचा कंठ दाटून आला होता.

 

सुप्रियाने देखील जाधव (Bhaskar Jadhav) कुटुंबातील सदस्यांना भावनिक निरोप दिला. तिने सुवर्णा जाधव आणि स्वरा यांना मिठी मारून अश्रूंना वाट मोकळी करून दिली. हा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि आपुलकीचा क्षण पाहून विवाह सोहळ्याला उपस्थित असलेल्या अनेकांचे डोळे पाणावले. जाधव कुटुंबाचे सुप्रियावरील प्रेम या प्रसंगातून स्पष्टपणे दिसून आले.

नात्यापलीकडचे प्रेम आणि सामाजिक संदेश-

सुप्रिया पाटील हिने गेली आठ वर्षे जाधव कुटुंबात (Bhaskar Jadhav) घरकाम केले. आपल्या प्रामाणिक आणि मनमिळाऊ स्वभावामुळे तिने जाधव कुटुंबातील सर्वांची मने जिंकली होती. त्यामुळेच जाधव कुटुंबीयांनी तिला नेहमी आपल्या मुलीप्रमाणेच वागवले. पाठवणीच्या वेळी, भास्कर जाधव यांनी सुप्रियाच्या सासरच्या मंडळींना अत्यंत भावूक होऊन सांगितले, “सुप्रिया माझ्या मुलीसारखी नाही, ती माझी मुलगीच आहे. ही लक्ष्मी (Lakshmi) आहे, तुमच्या घराला भरभराट देईल. तिला तुमच्या मुलीप्रमाणेच प्रेम द्या.”

राजकारणातील त्यांची कणखर प्रतिमा असतानाही, जाधव यांनी दाखवलेला हा जिव्हाळा पाहून स्थानिक ग्रामस्थ आणि रत्नागिरीकर (Ratnagiri residents) भारावून गेले. रक्ताचे नाते किंवा जातीचे बंधन नसतानाही एका घरकाम करणाऱ्या मुलीला पित्याचे प्रेम देऊन, तिच्या लग्नात सर्व जबाबदाऱ्या पार पाडून जाधव यांनी एक सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा आदर्श घालून दिला, ज्याने अनेकांची मने जिंकली.

News Title – Bhaskar Jadhav gets emotional at Aide’s Wedding

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now