Haircut | आजकालच्या धावपळीच्या जीवनात स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. त्यामुळे केस वाढतात आणि व्यक्तिमत्व आकर्षक वाटत नाही. चांगले दिसण्यासाठी अनेकजण रविवारचा दिवस केस आणि दाढी कापण्यासाठी निवडतात. परंतु, हिंदू धर्मात आठवड्यातील काही दिवस केस आणि दाढी कापण्यासाठी शुभ आणि काही अशुभ मानले जातात हे तुम्हाला माहिती आहे का? (Haircut)
तुमच्या जन्मतिथी, राशी, नक्षत्र आणि सामाजिक स्थितीनुसार आठवड्यातील कोणता दिवस केस कापण्यासाठी योग्य आहे हे ठरते. या सर्व प्रक्रियेत धार्मिक मान्यतांना देखील विशेष महत्व दिले जाते. चला तर मग जाणून घेऊया, आठवड्यातील कोणत्या दिवशी केस आणि दाढी करणे योग्य आहे.
‘या’ दिवशी केस कापू नयेत
विविध समुदायांमध्ये केस कापण्यासाठी आणि दाढी करण्यासाठी वेगवेगळे दिवस आणि मुहूर्त सांगितले जातात. तुमच्या केसांचा संबंध तुमच्या आयुष्याशी असतो आणि आयुष्यातील प्रत्येक घटना तुमच्या कुंडलीतील ग्रहांशी संबंधित असते. धार्मिक मान्यतेनुसार, सोमवार हा चंद्राचा दिवस असल्याने या दिवशी दाढी करणे अशुभ मानले जाते. हिंदू धर्मात असे मानले जाते की, सोमवारी केस कापल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. तसेच, सोमवारी केस कापल्याने आर्थिक चणचण भासू शकते. (Haircut)
मंगळवारी केस कापणे आणि दाढी करणे हे आयुष्यात अशुभ घटना घडण्याचे कारण ठरू शकते. मंगळवारी केस कापल्याने महत्वाच्या कामात अडथळे येतात आणि रक्ताशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते. बुधवारी केस कापणे हे तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. बुधवारी दाढी आणि केस कापल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते.
‘या’ दिवशी केस कापणे शुभ
हिंदू धर्मात, गुरुवारी केस कापल्याने आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते आणि या दिवशी विशेष पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. गुरुवारी केस कापल्याने आयुष्यातील अडथळे दूर होण्यास मदत होते. (Haircut)
शुक्रवारी केस आणि दाढी केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारते. शुक्रवारी केस कापल्याने नोकरीत प्रगती होते आणि आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. शनिवारी दाढी आणि केस कापल्याने सामाजिक आणि आर्थिक प्रगती होते. शनिवारी दाढी केल्याने शनिदेवाची कृपा राहते आणि धनलाभ होतो. अनेकांना रविवारी केस कापण्याची सवय असते कारण या दिवशी सुट्टी असते. परंतु, ज्योतिशास्त्रानुसार रविवारी केस कापणे अशुभ मानले जाते. रविवारी केस कापल्याने आर्थिक परिस्थिती बिघडते आणि आयुष्यात अडथळे निर्माण होतात.
Title : best day for haircut and shaving according to hindu religion






