गॅसच्या त्रासावर दिले मत्यूचे इंजेक्शन, डॉक्टर पतीचा क्रूर कट उघड, पोलिसही हादरले

On: October 16, 2025 5:19 PM
Pune Rain News
---Advertisement---

Bengaluru Doctor Crime | कर्नाटकची (Karnataka) राजधानी बंगळूरू (Bengaluru) येथे एक अत्यंत खळबळजनक घटना उघडकीस आली आहे, जिथे एका डॉक्टर पतीनेच आपल्या डॉक्टर पत्नीची हत्या केली. पत्नीच्या आजारपणाला कंटाळून पतीने तिला शक्तिशाली भूलचे इंजेक्शन देऊन तिचा जीव घेतला. सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या या हत्येचे गुपित आता उघड झाले असून, या क्रूर कृत्याने वैद्यकीय क्षेत्रालाही हादरा बसला आहे.

आजारपणाच्या नावाखाली रचला हत्येचा कट :

मृत डॉक्टर कृतिका एम. रेड्डी (Kritika M. Reddy), वय २८, या व्यवसायाने त्वचाविकारतज्ज्ञ होत्या. त्यांचा विवाह गेल्या वर्षी मार्च महिन्यात सर्जन डॉ. महेंद्र रेड्डी जी.एस. (Dr. Mahendra Reddy G.S.) यांच्याशी झाला होता. लग्नानंतर कृतिका यांना गॅस आणि इतर आरोग्य समस्यांचा त्रास होता आणि पती महेंद्रच त्यांच्यावर उपचार करत होते. याच वर्षी एप्रिल महिन्यात कृतिका यांचा अचानक मृत्यू झाला, तेव्हा सर्वांनी हा आजारपणामुळे झालेला नैसर्गिक मृत्यू मानला होता.

मात्र, कृतिका यांच्या वडिलांनी मृत्यूवर संशय व्यक्त करत पोलिसांकडे पुन्हा तपास करण्याची मागणी केली. यानंतर झालेल्या फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या (FSL) अहवालाने या प्रकरणाला पूर्णपणे कलाटणी दिली. शवविच्छेदन अहवालात कृतिका यांच्या शरीरात ‘प्रोपोफोल’ (Propofol) नावाचे शक्तिशाली भूलचे औषध मोठ्या प्रमाणात आढळून आले, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी पती महेंद्रला हत्येच्या आरोपाखाली अटक केली.

पत्नीच्या आजारपणाला वैतागून उचलले टोकाचे पाऊल :

पोलीस चौकशीदरम्यान, आरोपी डॉ. महेंद्रने हत्येमागील कारण उघड केले. लग्नानंतर काही काळातच आपल्याला पत्नी कृतिका अनेक गंभीर आरोग्य समस्यांशी झुंजत असल्याचे समजले, असे त्याने सांगितले. पत्नीच्या सततच्या आजारपणाला आपण वैतागलो होतो आणि तिच्या कुटुंबीयांनी लग्नापूर्वी ही माहिती आपल्यापासून लपवून ठेवत आपली फसवणूक केली, असा आरोपही त्याने केला. याच रागातून आपण तिची हत्या केल्याची कबुली महेंद्रने दिली. (Bengaluru Doctor Crime)

तपासात डॉ. महेंद्र यांचा गुन्हेगारी पूर्वेतिहास असल्याचेही समोर आले आहे. त्याच्यावर यापूर्वी फसवणूक आणि धमकी देण्यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. आता पोलिसांनी या प्रकरणात हत्येचे कलमही जोडले असून, या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

News title : Bengaluru Doctor Murders Wife With Injection

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now