मुंबईकरांसाठी गुडन्यूज! ‘हा’ नवा पूल आजपासून खुला

On: February 26, 2026 11:32 AM
Belasis Bridge News
---Advertisement---

Belasis Bridge News | दक्षिण मुंबईतील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला बेलासिस रेल्वे उड्डाणपूल अखेर प्रवाशांच्या सेवेत सुरू होत आहे. १३० वर्षांच्या इतिहासाचा वारसा असलेला हा पूल मुंबई सेंट्रल आणि नागपाडा (Nagapada) भागांना जोडण्यास सज्ज झाला असून, आज त्याचे लोकार्पण होणार आहे. मात्र पादचाऱ्यांसाठी आणि बस स्थानकासाठी सोयी नसल्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त झाली आहे.

बेलासिस पूलचे लोकार्पण :

गेल्या अनेक महिन्यांपासून पुनर्बांधणीची प्रतीक्षा चालू असलेल्या बेलासिस पुलाचे लोकार्पण २६ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करतील. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार(Sunetra Pawar) आणि महापौर रितू तावडे(Ritu Tawde) यांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडणार आहे. या नव्या पूलामुळे दक्षिण मुंबईतील वाहतुकीचे दृश्य बदलण्याची अपेक्षा आहे.

बेलासिस पूल (Belasis Bridge News) सुरू झाल्यामुळे पठ्ठे बापूराव मार्ग, महालक्ष्मी स्थानक पूल आणि ताडदेव परिसरातील वाहतुकीचा ताण सुमारे ५० टक्क्यांनी कमी होईल. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर पोहोचण्यासाठी वाहनचालकांना लांबचा वळसा घालण्याची गरज भासणार नाही. १८९० च्या दशकात बांधलेला जुना पूल मोडकळीस आल्याने तो पाडण्यात आला होता, तर नव्या पूलात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मजबुती वाढवण्यात आली आहे.

Belasis Bridge News | स्थानिकांचा विरोध :

पूल फक्त वाहनांसाठी उपलब्ध असल्याने स्थानिक आणि ज्येष्ठ नागरिकांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. जुन्या पुलावर बेस्ट बसचे अधिकृत थांबे होते, ज्यामुळे मुंबई सेंट्रल स्टेशनवरून उतरणाऱ्या प्रवाशांना बस पकडणे सोपे जात असे, परंतु नवीन पुलावर ही सोय नाही. पादचाऱ्यांसाठी सोयीस्कर एन्ट्री व एक्झिट पॉईंट्स नसल्यामुळे नागरिकांना पुलाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालत जावे लागणार आहे, अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे.

तसेच तांत्रिक कारणे आणि रेल्वे सुरक्षा नियमांमुळे नवीन आराखड्यात काही बदल करण्यात आले आहेत. मात्र नागरिकांच्या वाढत्या मागण्यांमुळे प्रशासन आता फेरविचार करेल की नाही, हे पाहणे महत्वाचे ठरेल. स्थानिकांची सुरक्षितता आणि सुविधा यावर प्रशासनाची पुढील प्रतिक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.

News Title: Belasis Bridge Opens in South Mumbai

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now