‘जिरली काय तुझी, आता…’; कराडला मारलेल्या ‘त्या’ टोमण्याने तुरुंगात राडा

On: April 1, 2025 1:36 PM
Valmik Karad
---Advertisement---

Walmik Karad | बीड जिल्हा कारागृहात (Beed District Jail) वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि बबन गिते (Baban Gite) गटातील कैद्यांमध्ये सोमवारी सकाळी झालेल्या राड्याची नवी माहिती समोर आली आहे. नाश्त्याच्या वेळी झालेल्या या वादाची सुरुवात संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येवरून मारलेल्या टोमण्यांनी झाली आणि त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले. या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलत दोन्ही गटांतील काही प्रमुख कैद्यांना दुसऱ्या कारागृहांमध्ये हलवले आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी वाल्मिक कराडला तुरुंगात ‘व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट’ मिळत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

टोमण्यानंतर झटापट :

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास, कैद्यांना फोन करण्यासाठी बराकीतून बाहेर काढण्यात आले होते. यावेळी महादेव गिते (Mahadev Gite) याच्या समर्थक कैद्यांनी वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून डिवचण्यास सुरुवात केली. “आता जिरली काय रे तुझी? की अजून जिरायची आहे?” अशा प्रकारचे टोमणे मारल्यामुळे दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.

हा वाद वाढत जाऊन त्याचे रूपांतर झटापटीत झाले. यावेळी महादेव गिते आणि अक्षय आठवले (Akshay Athawale) हे दोघे वाल्मिक कराडच्या अंगावर धावून गेले. तेव्हा कराडचा साथीदार सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) मध्ये पडला आणि त्यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याचे वृत्त आहे. तर, वाल्मिक कराडलाही कानशिलात लगावल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तुरुंग पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी कराडला किरकोळ मारहाण झाल्याचे म्हटले होते, तर महादेव गितेने मात्र कराडनेच मारहाण केल्याचा उलट दावा केल्याचेही वृत्त होते.

कैद्यांचे स्थलांतर :

या राड्यानंतर तुरुंग प्रशासनाने तातडीने कारवाई करत दोन्ही गटांतील प्रमुख कैद्यांना वेगवेगळ्या कारागृहांमध्ये हलवले आहे. महादेव गिते याच्यासह इतर चौघांना छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील हर्सुल कारागृहात (Harsul Jail) पाठवण्यात आले आहे. तर, अक्षय आठवले, मनीष शिरसागर (Manish Shirsagar) आणि सवाई (Sawai) यांना नाशिक (Nashik) येथील कारागृहात हलवण्यात आले आहे. हे स्थलांतर तुरुंगातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि पुढील संघर्ष टाळण्यासाठी करण्यात आले आहे.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना वाल्मिक कराडला तुरुंगात विशेष वागणूक मिळत असल्याचा आरोप केला आहे. “माझ्याकडे कारागृहातून आलेली माहिती अगदी ऑथेंटिक आहे. वाल्मिक कराडला तीन-चार चापट्या मारल्या होत्या… पण त्यांना फक्त माऱ्यामाऱ्या होतायेत तशी मारहाण नव्हती झाली,” असे सांगत त्यांनी मारहाणीचे स्वरूप स्पष्ट केले. मात्र, त्यांनी पुढे गंभीर आरोप केला, “वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) अतिशय जवळचा आहे. जावई असल्यासारखं त्याला सारखं प्रोटेक्ट करताना आपण एकदा नाही अनेकवेळा बघतोय… त्याच्या छान सुखसोयी होतायेत… वाल्मिक कराड त्यांच्या घरचा आहे. त्याच्या सुखसोयी ठेवून महादेव गितेची रवानगी आता दुसऱ्या ठिकाणी केली. त्यात काहीच नवल वाटत नाही.” दमानियांच्या या आरोपांमुळे तुरुंग प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

News title : Beed Jail Clash Karad Gite Taunts Transfers Damania

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now