“आधी पूजाने टाळलं, मग आईलाही दया नाही…”, गोविंदच्या मृत्यूमागील नेमकं कारण उघड

On: September 12, 2025 5:15 PM
Govind Barge Death Case
---Advertisement---

Pooja Gaikwad Arrest | बीड जिल्ह्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या मृत्यूमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. नर्तकी पूजा गायकवाड सोबतच्या प्रेमसंबंधातून झालेली फसवणूक, मालमत्तेवर तगादा आणि ब्लॅकमेलिंगमुळे गोविंदने स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपवलं. या प्रकरणी पूजाला पोलिसांनी अटक केली असून चौकशी सुरू आहे.

प्रेमसंबंधातून आर्थिक फसवणूक :

गोविंद बर्गेंची (Govind Barge) पूजा गायकवाडशी ओळख एका कला केंद्रात झाली होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर गोविंदने तिच्यासाठी दागिने, मोबाईल, मोटारसायकल, प्लॉट, शेतीसह लाखो रुपयांची मौल्यवान वस्तू दिली. याशिवाय गेवराई (Gevrai) येथे भव्य बंगला बांधला, ज्यात त्याची पत्नी, मुले आणि वडील राहत होते.

पूजा काही दिवस या बंगल्यात राहिली होती. त्यानंतर तिने तो बंगला स्वतःच्या नावावर करण्याचा तगादा लावला. गोविंदने तिला समजावून सांगितलं की, “तुझ्यासाठी दुसरा बंगला उभारतो,” पण पूजा तयार नव्हती. उलट तिने गोविंदला धमकी दिली – “बंगला माझ्या नावावर केला नाहीस तर बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवीन.” त्यानंतर तिने त्याच्याशी संपर्क तोडला.

Pooja Gaikwad Arrest | भेटीचा अयशस्वी प्रयत्न :

घटनेच्या दिवशी गोविंद तणावाखाली पूजाला भेटण्यासाठी कला केंद्रात गेला, मात्र ती तिथे नव्हती. त्याने तिच्या मैत्रिणीमार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण निष्फळ ठरला. अखेरीस तो थेट पूजाच्या घरी गेला आणि तिच्या आईकडे विनंती केली – “पूजाला समजवा, ती माझ्याशी बोलत नाही,” पण तिथूनही त्याला मदत मिळाली नाही.

या सर्व अपमान, धमक्या आणि तणावामुळे गोविंद पूर्णपणे खचला. तो पूजाच्या घराबाहेर गाडीत बसला आणि तिथेच स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. (Pooja Gaikwad Arrest)

पूजावर गंभीर आरोप :

गोविंदच्या कुटुंबीयांनी पूजावर गंभीर आरोप केले आहेत. “तिने प्रेमाच्या नावाखाली आर्थिक लूट केली, भावनिक छळ केला आणि ब्लॅकमेल केलं,” असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पूजाला अटक केली असून, तिच्याकडून कसून चौकशी सुरू आहे.

News Title: Beed Crime: Ex-Deputy Sarpanch Govind Barge Dies

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now