बावनकुळेंच्या खेळीने बडगुजरांचा भाजप प्रवेश धोक्यात!, नेमकं काय घडलं?

On: June 17, 2025 11:57 AM
Sudhakar Badgujar BJP
---Advertisement---

Bawankule vs Badgujar | शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या सुधाकर बडगुजर (Sudhakar badgujar) यांच्या राजकीय भविष्यावर आता अनपेक्षित संकट उभं राहिलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrshekhar bawankule) यांनी बडगुजर यांच्या प्रवेशाबाबत “माझ्याकडे कोणतीही माहिती नाही” असे वक्तव्य केल्याने गोंधळ वाढला आहे. विशेष म्हणजे या सगळ्यामागे काही महिन्यांपूर्वीचा कॅसिनो फोटो वाद आणि एका व्हायरल व्हिडीओचा संबंध असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

कॅसिनो वादाची पार्श्वभूमी, संजय राऊत यांचा आरोप :

चंद्रशेखर बावनकुळे काही महिन्यांपूर्वी कुटुंबासोबत माकाऊमध्ये गेले असताना त्यांचा एका कॅसिनोबाहेरचा फोटो व्हायरल झाला होता. खासदार संजय राऊत यांनी तो फोटो ट्विटरवर शेअर करत भाजपवर टीका केली होती. त्यावेळी असा आरोप झाला की, हा फोटो सुधाकर बडगुजर (Sudhakar badgujar) यांच्या माध्यमातूनच राऊतांपर्यंत पोहचवण्यात आला. त्यामुळे बडगुजरांविषयी बावनकुळे मनात आकस बाळगत आहेत का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

बावनकुळे यांनी मात्र स्पष्टीकरण देत सांगितले होते की, “मी कुटुंबासोबत हाँगकाँगला गेलो होतो. तिथे प्रत्येक हॉटेलात कॅसिनो असतो. तो क्रॉस करताना हा फोटो काढला गेला. माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय.”

Bawankule vs Badgujar | ‘देशद्रोह’ ते भाजप प्रवेश: बडगुजरांभोवती राजकीय वादळ :

बडगुजरांचा एक व्हिडीओ सलीम कुत्ता नावाच्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीसोबत नाचताना व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत सादर केला होता. त्यामुळे बडगुजर (Sudhakar badgujar) यांना थेट देशद्रोही ठरवले गेले होते आणि आता अशा व्यक्तीचा भाजपमध्ये प्रवेश होतोय, हे विरोधकांसह अनेक भाजप नेत्यांनाही खटकत आहे.

बडगुजर यांनी पक्षप्रवेशाबाबत बावनकुळे (Chandrshekhar bawankule) यांच्या वक्तव्यावर भाष्य करत “सर्व काही ठरलंय, मी उगाच जात नाही, मुंबईत गेल्यावर सर्व समजेल” असे म्हटले आहे. यामुळे गिरीश महाजन यांच्या पाठबळामुळे बडगुजर यांना प्रवेश मिळतोय का, हा राजकीय चर्चेचा मुद्दा बनला आहे.

कोण आहेत सुधाकर बडगुजर? :

सुधाकर बडगुजर यांनी 2007 साली नाशिक महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर 2008 साली शिवसेना (ठाकरे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला. 18 वर्ष शिवसेनेत कार्यरत राहिल्यानंतर आता भाजपकडे वळणाऱ्या या नेत्याच्या आजूबाजूला वादांची मालिका सुरूच आहे.

News Title: Bawankule vs Badgujar: Casino Photo Controversy Casts Shadow Over BJP Entry, Political Tensions Rise

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now