रोहित शर्मा रिटायर होणार? टीम इंडियाच्या कोचने दिल उत्तर

On: July 17, 2026 2:43 PM
Rohit Sharma
---Advertisement---

Rohit Sharma | भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्या निवृत्तीच्या चर्चांनी वेग घेतला आहे. मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना 19 जुलै रोजी होणार असून, त्यानंतर रोहित निवृत्त होणार असल्याच्या चर्चांवर भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक (Sitanshu Kotak) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

रोहितवरील दबावाच्या चर्चांवर कोटक यांचे उत्तर :

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकल्याने मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. त्यामुळे 19 जुलै रोजी होणारा अंतिम सामना निर्णायक ठरणार आहे. याच सामन्यानंतर रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करू शकतात, अशा चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर दुसऱ्या वनडे सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सितांशु कोटक यांना रोहितच्या भविष्याबाबत प्रश्न विचारण्यात आला.

त्यावर कोटक म्हणाले की, रोहित शर्मासारख्या अनुभवी आणि मोठ्या खेळाडूवर दबावाचा परिणाम होईल, असे त्यांना वाटत नाही. त्यांच्या मते, मागील दोन डावांत रोहितला मोठी खेळी करता आली नसली तरी त्यावरून त्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता येणार नाही. क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडत असतात आणि प्रत्येक सामन्यात यश मिळेलच असे नसते. दुसऱ्या सामन्यातही रोहित मोठी धावसंख्या उभारेल, अशी अपेक्षा होती; मात्र तसे झाले नाही, असे त्यांनी नमूद केले.

Rohit Sharma | खराब फॉर्मवरही प्रशिक्षकांचा विश्वास कायम :

रोहित शर्मा धावा करण्यासाठी संघर्ष करत असल्याचे मतही सितांशु कोटक यांनी फेटाळून लावले. लॉर्ड्स (Lord’s) येथे होणाऱ्या निर्णायक सामन्यात रोहित पूर्णपणे वेगळ्या फॉर्म मध्ये दिसू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

त्यांच्या म्हणण्यानुसार, काही वेळा फलंदाजांना खेळपट्टी आणि परिस्थितीमुळे अपेक्षित लय मिळत नाही. कार्डिफ (Cardiff) येथील खेळपट्टीवर चेंडू अनियमित उसळत असल्याने रोहितला त्याच्या आवडीचे फटके खेळणे कठीण गेले. तसेच त्याला हवे तसे चेंडूही मिळाले नाहीत.

News Title: Batting Coach Backs Rohit Sharma

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now