बारामतीत EVM ठेवलेल्या रुमचे CCTV 45 मिनिटं बंद; शरद पवार गटाकडून गैरप्रकार घडल्याची शंका

On: May 13, 2024 3:14 PM
Vidhansabha Result
---Advertisement---

Baramati Lok Sabha | बारामती लोकसभा मतदार संघात मतदान पार पडलंय. मात्र, अजूनही इथे राजकीय नाट्य सुरूच असल्याचं चित्र आहे. अगोदर बारामतीमध्ये मध्यरात्री पैसे वाटण्यात आल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता.ऐन मतदानाच्या दिवशी या आरोपांमुळे खळबळ उडाली होती.

आता इथे एक नवीन मुद्दा समोर आला आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बारामतीसाठी 7 मे रोजी मतदान पार पडलं. त्यानंतर बारामतीमधील सर्व मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीन्स या एका गोदामातील स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आल्या होत्या.

सीसीटीव्ही फुटेज अचानक बंद झाल्याने संताप

ईव्हीएम मशीन्स असलेल्या या स्ट्राँग रुमवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या (Baramati Lok Sabha)माध्यमातून निगराणी ठेवली जात आहे. मात्र, या स्ट्राँग रुमचे बाहेरच्या मॉनिटरवर दिसणारे सीसीटीव्ही फुटेज अचानक बंद झाल्याची घटना घडल्याचा आरोप शरद पवार गटाने केला आहे. यामुळे संताप व्यक्त केला जातोय.

सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी या प्रकरणी आक्षेप घेतला आहे. याबाबत त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी धक्कादायक आरोप केले आहेत.

गैरप्रकार झाल्याची शंका व्यक्त केली जातेय

ईव्हीएम मशीन्स ठेवलेल्या स्ट्राँग रुमचं सीसीटीव्ही फुटेज सकाळी 10.25 वाजल्यापासून बंद आहे. यामागे नेमके काय कारण आहे? मी यासाठी त्या विभागाच्या आरओला फोन केला, पण त्यांनी फोन उचलला नाही. तिकडे टेक्निशियन्स नाहीत, आमच्या लोकांना गोदामापर्यंत जाऊ दिले जात नाही. हे सगळं काय चाललंय?,असा प्रश्न लक्ष्मीकांत खाबिया यांनी केला आहे.

यानंतर स्ट्राँग रुमचे सीसीटीव्ही फुटेज मॉनिटरवर पुन्हा दिसायला लागले. मात्र, शरद पवार गटाकडून आता गैरप्रकार घडला असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. तर, दुसरीकडे सीसीटीव्ही कॅमेरांची दृश्ये ज्या स्क्रिनवर दिसतात, ती स्क्रिन काही वेळासाठी बंद होती. कॅमेरा बंद नव्हते. असं निवडणूक (Baramati Lok Sabha) अधिकाऱ्यांनी म्हटलंय.

News Title – Baramati Lok Sabha Allegations about EVM by Sharad Pawar group

महत्त्वाच्या बातम्या-

“मिस्टर राज, तुमच्यात अन् माझ्यात एक फरक…”, राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचा करारा जवाब

लग्नानंतरही ‘या’ अभिनेत्यासोबत होतं श्वेता बच्चनचं अफेअर?, मोठी माहिती समोर

अवकाळी पावसासह महाराष्ट्रावर दुहेरी संकट; ‘या’ जिल्ह्यांना हायअलर्ट

नगरमध्ये विखेंनी अधिकारीच धरले हाताशी? निलेश लंकेनी केला व्हिडीओ शेअर

“धर्मावरून पाकिस्तानला इस्लामिक राष्ट्र बनवलं मग भारताला हिंदू..”; कंगनाचं मोठं वक्तव्य

Join WhatsApp Group

Join Now