…तर विरोधकांचं डोकं फिरलय; अजित पवारांचा घरच्या व्यक्तीवर अत्यंत कडू शब्दात प्रत्यारोप

On: May 7, 2024 9:04 AM
Ajit Pawar
---Advertisement---

Ajit Pawar l आज राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील ११ जागांसाठी मतदान होत आहे. त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्वाचा असणार आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीत काल आमदार रोहित पवारांनी एक्सकरून बारामतीतील भोरमध्ये मतदारांना अजित पवार मित्रमंडळाकडून पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप केला आहे. रोहित पवारांचा हा आरोप अजित पवारांनी फेटाळला आहे.

Ajit Pawar l अजित पवारांनी सर्व आरोप फेटाळले :

रोहित पवारांनी मतदारांना पैसे वाटले असल्याचा आरोप केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हे आरोप फेटाळले आहेत. आरोप करणाऱ्यांचं डोकं फिरल्याचा पलटवार उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला आहे. अजितदादांनी काटेवाडीत मतदान केल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

यासंदर्भात अजित पवार म्हणाले, सध्या ते आमच्यावर आरोप करतच आहे. मी देखील त्यांनी निवडणूक अतिशय चुकीच्या पद्धतीने हाताळली आहे असा आरोप करतो. परंतु मी आरोर देखील करणार नाही. ते काहीपण आरोप करत आहेत. काल रात्री जिल्हा मध्यवर्ती बँक उघडी असल्याचे कोणी पाहिले का? तर तो व्हिडीओ कालचा होता का? याची कोणी शाहनिशा केली का? तर समोर आरोप करणाऱ्या व्यक्तीवर परिणाम झाला आहे त्यामुळे तो काही आरोप करत आहे.

ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणार : अजित पवार

काल मध्यरात्री झालेल्या बारामती आणि वेल्ह्यात पैसे वाटल्याचा आरोप फेटाळत अजित पवार यांनी फेटाळल्यानंतर ते म्हणाले कि, हे काम निवडणूक आयोगाचे आहे. मी तब्बल सात विधानसभा लोकसभा निवडणुका लढवल्या आहेत. आजपर्यंत मी असे कधी केले नाही आणि यापुढे देखील करणार नाही. कारण नसताना विरोधकांमधील काही बागलबच्चे असे धांदत आरोप माझ्यावर करत आहे. मी त्याला कसलंही महत्त्व देत नाही.

मी विकासाच्या मुद्द्यावर या निवडणूकीत निवडणूक प्रचार केला आहे. या मतदारसंघात आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न देखील केला आहे मी शेवटच्या सभेपर्यंत सांगितले की, ही भावकिची किंवा गावकीची निवडणूक नाही. तर ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षाचा विकास डोळ्यासमोर ठेवूनच मतदान करा असे अजित परर म्हणाले आहेत.

News Title – Baramati Lok Sabha Ajit Pawar Against Statement On Rohit Pawar

महत्त्वाच्या बातम्या

मध्यरात्री बारामतीत पडला पैशांचा पाऊस; रोहित पवारांनी केला व्हिडीओ शेअर

धाकधूक वाढली! तिसऱ्या टप्प्यातील ‘या’ दिग्गजांचे भवितव्य ठरणार; कोण बाजी मारणार

आज ‘या’ राशींना मिळेल सुखाचा गारवा; बक्कळ पैशांसह प्रेमप्रकरणात मिळेल यश

ठाण्यातील राजकारण तापलं; राजन विचारेंचा नरेश म्हस्केंबाबत मोठा गोप्यस्फोट

जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावणार मुरलीधर मोहोळ

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now