बारामती पोटनिवडणुकीबाबत मोठी बातमी! दादांची जागा कोण घेणार? महत्वाची माहिती आली समोर

On: February 25, 2026 6:33 PM
Baramati Election
---Advertisement---

Baramati Election | बारामती विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. दीर्घकाळ मतदारसंघाचे नेतृत्व करणारे अजित पवार यांच्या निधनानंतर आता पोटनिवडणूक होणार असून, या निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

सुनेत्रा पवार मैदानात उतरणार? :

मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Baramati Vidhansabha Election) सुनेत्रा पवार (Sunetra pawar) यांनाच उमेदवारी देण्यावर एकमत झाल्याची चर्चा आहे. सध्या त्या राज्यसभेच्या खासदार आहेत. उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांना सहा महिन्यांच्या आत विधानसभा किंवा विधानपरिषद यापैकी एका सभागृहाचे सदस्य होणे आवश्यक आहे. त्यामुळेच बारामतीतून त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार असल्याचे म्हणणे आहे.

बारामती मतदारसंघ हा अनेक वर्षे अजित पवार (Baramati Election News) यांच्या नेतृत्वाखाली राहिला. त्यांच्या काळात विविध विकासकामे झाल्याने हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. आता त्यांच्या अनुपस्थितीत पक्षाची पुढील रणनीती काय असेल, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Baramati Election | बिनविरोध निवडणुकीचे संकेत :

या पोटनिवडणुकीबाबत आणखी एक मोठी शक्यता व्यक्त केली जात आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीतील निवडणूक बिनविरोध होऊ शकते, असे संकेत दिले आहेत. प्ररूप मतदारयादी 10 मार्च रोजी जाहीर होणार असून, त्यानंतर निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते.

दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीतील घटकपक्षांशी चर्चा करून अंतिम भूमिका जाहीर केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रत्यक्ष लढत होणार की बिनविरोध पार पडणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

दुसरीकडे, अजित पवार (AJit Pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांना राज्यसभेत संधी दिली जाऊ शकते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आगामी काही दिवसांत बारामतीच्या राजकारणात आणखी घडामोडी होण्याची शक्यता आहे.

News Title: Baramati By Election 2026 Update

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now