पुण्यात भाजपला मोठा झटका, माजी आमदाराने केला शरद पवार गटात प्रवेश

On: September 18, 2024 8:45 AM
Sharad Pawar
---Advertisement---

Sharad Pawar Group | विधानसभा निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. मात्र, त्यापूर्वीच भाजपला धक्क्यावर धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजपला पश्चिम महाराष्ट्रातून मोठा धक्का बसला. शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज, भाजपचे नेते समरजित घाटगे यांनी भाजपला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. अशात पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. (Sharad Pawar Group)

गेल्या अनेक दिवसांपासून माजी आमदार आणि भाजपचे नेते बापूसाहेब पठारे हे भाजपला रामराम करण्याची शक्यता वर्तवली जात होती. बापूसाहेब पठारे गणपती मंडळाच्या कार्यक्रमातून हाती तुतारी घेणार असल्याचं म्हटलं जात होतं. अखेर या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत.

पुण्यातील बापूसाहेब पठारे शरद पवार गटात

काल 17 सप्टेंबररोजी अनंत चतुर्दशीला मुहूर्त गाठत भाजपाचे नेते माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी थेट शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. (Sharad Pawar Group)

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळाल्या. यामुळे मविआ नेत्यांचा विश्वास वाढला आहे. तर, महायुतीमधील अनेकांनी पुन्हा एकदा मविआकडे परतीची वाट धरली आहे. गेल्या काही दिवसांत महायुतीमधील अनेक नेत्यांनी महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केलाय. अशात पुण्यातील भाजपचे बडे नेते बापूसाहेब पठारे यांनी देखील विधानसभेपूर्वीच भाजपला धक्का दिलाय.

बापूसाहेब पठारे अजितदादांना आव्हान देणार?

वडगाव शेरीची जागा भाजपकडे नसल्याने बापूसाहेब पठारे नाराज होते. वडगाव शेरीत सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे आमदार आहेत. अजित पवार सध्या भाजपसोबत सत्तेमध्ये आहेत. त्यामुळे विधानसभेला ही जागा त्यांच्याकडेच जाण्याची दाट शक्यता आहे. भाजपला ही जागा मिळेल की नाही, याबाबत अद्याप काहीही ठरलेलं नाही.अशात बापूसाहेब पठारे यांनी तुतारी हाती घेतली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी ‘तुतारी’च आपलं चिन्ह असल्याचं जाहीर करत प्रचाराला देखील सुरुवात केली होती.

यापूर्वी शरद पवारांनी कोल्हापुरात भाजपला धक्का दिला. आता पुण्यात भाजपला दूसरा मोठा धक्का बसला आहे. बापूसाहेब पठारे यांनी गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी विविध गणेश मंडळांना भेटी देत विधानसभेसाठी आपण ‘तुतारी’ हाती घेणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. अखेर त्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश झाला आहे. दरम्यान, बापूसाहेब पठारे यांना आगामी विधानसभा निवडणुकीत वडगावशेरी मतदारसंघात शरद पवार गटातून उमेदवारी निश्चित मानली जात आहे. (Sharad Pawar Group)

News Title –  Bapusaheb Pathare  join Sharad Pawar Group

महत्वाच्या बातम्या- 

रेल्वेत होतेय बंपर भरती, तरूणांनो सरकारी नोकरीची संधी गमावू नका!

आज ‘या’ राशींवर राहील स्वामींची अपार कृपा, आर्थिक चणचण संपणार!

पुण्यात गणपती मिरवणुकीला येताय? तर या ठिकाणी करा गाड्या पार्क, मेट्रोचं काय?

‘या’ अभिनेत्रीने पैशांसाठी देहविक्रीचा व्यवसाय केला; स्वतः दिली कबुली

मला मुख्यमंत्री व्हायचंय…; अजित पवारांच्या मनातील गोष्ट आली ओठावर

Join WhatsApp Group

Join Now