बँका आठवड्यातून फक्त 5 दिवसच सुरु राहणार? नवीन नियम लागू होण्याची शक्यता

On: August 7, 2025 12:53 PM
Bank Holidays
---Advertisement---

Bank Holiday | आता बँकांमध्ये देखील आठवड्यातून फक्त पाच दिवस काम आणि दोन दिवस सुट्टीचा नवा नियम लागू होण्याची शक्यता आहे. सध्या बँका दर रविवारी आणि दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बंद असतात. मात्र, लवकरच सर्व शनिवारी आणि रविवारी बँका बंद ठेवण्यात येतील, असं संकेत मिळत आहेत. बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी यासाठी सरकारकडे आणि RBI कडे प्रस्ताव दिला आहे. (Bank Holiday)

बँक संघटनांचा प्रस्ताव – कामाचे तास वाढवून आठवड्यातून दोन दिवस सुट्टी :

ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन (AIBOC) आणि इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) यांनी सरकारला प्रस्ताव दिला आहे की, आठवड्यातील सर्व शनिवारी बँका बंद ठेवाव्यात आणि त्याऐवजी दररोज ४५ मिनिटे जास्त काम करण्यात यावं. यामुळे बँक कर्मचारी अधिक कार्यक्षम आणि समाधानी राहतील, असं या संघटनांचं म्हणणं आहे.

सध्या या प्रस्तावाला RBI आणि सरकारची अंतिम मान्यता मिळालेली नाही. मात्र, बँक कर्मचारी आशावादी असून लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. जर सरकार आणि RBI यावर सहमत झाले, तर देशभरातील सर्व सार्वजनिक आणि खासगी बँकांमध्ये हा नवा नियम लागू केला जाईल.

Bank Holiday | नव्या वेळेनुसार बँकांची कामकाजाची वेळ बदलणार :

पाच दिवस कामकाजाच्या नियमानंतर बँकांची वेळही थोडी बदलणार आहे. नव्या वेळापत्रकानुसार, बँका सकाळी 10 ऐवजी 9:45 वाजता उघडतील व सायंकाळी 4 ऐवजी 5:30 वाजेपर्यंत उघड्या राहतील यामुळे बँका ग्राहकांना अधिक वेळ सेवा देऊ शकतील आणि कर्मचारीही दोन दिवसांची विश्रांती घेऊ शकतील. (Bank Holiday)

२०१५ मध्ये केंद्र सरकारने दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुट्टी लागू केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा बँक कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून दोन दिवस सुट्टीची मागणी केली आहे. सरकार आणि RBI या संदर्भात सकारात्मक भूमिका घेत असल्याचे संकेत मिळत आहेत.

News Title: Banks May Soon Work Only 5 Days a Week – New Proposal Awaits Govt and RBI Nod

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now