लंकेच्या प्रचारात नवा मुद्दा, गुजरातच्या हार्दिक पांड्याला मुंबईचा कॅप्टन केल्याने लोक नाराज!

On: May 8, 2024 6:11 PM
Nilesh Lanke
---Advertisement---

Balasaheb Thorat | देशामध्ये आयपीएलचा सतरावा हंगाम आणि लोकसभा निवडणूक 2024 सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे निलेश लंके यांची श्रीगोंदा येथे सभा पार पडली. यांच्या सभेमध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी बोलत असताना बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आयपीएचला दाखला देत विरोधकांवर टीका केली आहे.

आयपीएलच्या सतराव्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माला कर्णधार पदावरून काढण्यात आलं. त्याच्या जागी गुजरातचा माजी कर्णधार हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार करण्यात आलं. यामुळे क्रिकेट चाहते नाराज असल्याचं बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सभेत सांगितलं.

नेमकं काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

निलेश लंके यांच्या सभेत कार्यकर्त्यांचा करंट हा 3000 व्होल्टचा करंट असतो. कार्यकर्त्यांचा करंटच जर 3000 व्होल्टचा व्होल्टचा असेल तर शॉक कसा असेल. नुसता जाळ होईल जाळ, असं बाळासाहेब थोरात म्हणाले, आपली निवडणूक यशस्वीरित्या पार पाडायची आहे. शेवटचं मत पडेपर्यंत दक्षता घ्यायची आहे, असं बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले आहेत.

निलेश लंके यांनी मतदारसंघात चांगलं काम केलं आहे. कोरोनाकाळात त्यांनी मोठं काम केलं आहे. पंतप्रधानांच्या सर्व सभा फेल आहेत. ते काय बोलत असतात हे त्यांचं त्यांना कळत नाही, असा टोला बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी लगावला आहे.

मात्र यावेळी बोलत असताना त्यांनी कांदानिर्यातीवर देखील भाष्य केलं आहे. कांदा निर्यातीवरील बंदी आता हटवली असल्याचं सांगितलं जातंय, मात्र एकाच ठिकाणाहून कांद्याची निर्यात होतेय. त्यानंतर थोरात यांनी सध्या सुरू असलेल्या आय़पीएलवर देखील राजकारण सुरू असल्याचं सांगितलं आहे.

रोहित-हार्दिकच्या कर्णधारपदावर बाळासाहेबांचं वक्तव्य

मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माचं कर्णधारपद काढून गुजरातच्या हार्दिक पांड्याला कर्णधारपद दिलं आहे. लोक नाराज झाले आहेत. खेळातही राजकारण आणता. यामुळे क्रिकेटवाले नाराज आहे. अशामुळे तुम्हाला गुजरातला जावं लागेल, असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

News Title – Balasaheb Thorat Say About Cricket Fans Unhappy About Rohit-Hardik Captaincy

महत्त्वाच्या बातम्या

‘आगामी काळात…’; शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

T20 World Cup बाबत रवी शास्त्रींची मोठी भविष्यवाणी!

“शाहरुखपेक्षा जास्त पैशांची ऑफर होती पण..”, प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याच्या वक्तव्याने खळबळ

प्रेग्नंट दीपिका अन् रणवीरच्या संसारात वादळ?, घेतला मोठा निर्णय

अजित पवार संतापले, भाजप जिल्हाध्यक्षाला खाली बसवलं; शिवाजी आढळरावांनी मागितली माफी

Join WhatsApp Group

Join Now