बाळासाहेब थोरातांनी निवडणूक आयोगावर केले गंभीर आरोप; राजकारणात खळबळ

On: October 22, 2025 6:00 PM
Balasaheb Thorat
---Advertisement---

Balasaheb Thorat | अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील संगमनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी निवडणूक आयोगावरच (Election Commission) गंभीर आरोप करत मोठा राजकीय वाद उभा केला आहे.

थोरात- नगरपरिषदेच्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर अनियमितता

बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी म्हटलं आहे की, “संगमनेर नगरपरिषदेच्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर अनियमितता करण्यात आली असून साडेनऊ हजारांहून अधिक नावांमध्ये घोळ करण्यात आला आहे. त्यांनी आरोप केला की, ही मतदार यादी बनावटपणे तयार करण्यात आली असून काही मतदारांची नावं मुद्दामहून वगळण्यात आली आहेत, तर काही ठिकाणी मृत व्यक्तींची नावंही समाविष्ट करण्यात आली आहेत.”

थोरात यांनी या प्रकरणाची दखल घेण्यासाठी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली असून, तरीही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. त्यांच्या मते, मतदार यादीतील हा प्रकार म्हणजे लोकशाही प्रक्रियेवर घाला घालणारा प्रकार असून, प्रशासन आणि आयोगाने याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. त्यांनी असा दावा केला की, हा संपूर्ण प्रकार राजकीय दबावाखाली घडवून आणला गेला असून, काही लोकांनी मुद्दामहून मतदारसंख्या बदलून निवडणुकीच्या निकालावर परिणाम करण्याचा प्रयत्न केला आहे.

विखे आणि खताळ यांचे प्रत्यत्तर

या आरोपांनंतर भाजप (BJP) नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishn Vikhe-Patil) यांनी थोरात यांच्यावर पलटवार करत, “चोराच्या उलट्या बोंबा” असा टोला लगावला. विखे पाटील म्हणाले की, “संगमनेरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून थोरात यांचा दबदबा आहे आणि आता जनता स्वतःच बदल घडवणार आहे.” दरम्यान, संगमनेरचे आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांनीही थोरात यांच्यावर हल्लाबोल करत म्हटलं की, “नगरपालिका निवडणुकीच्या प्रारूपतर यादीबाबत महायुतीकडून आम्ही त्या संदर्भात हरकती नोंदवल्या आहेत. गेली 40 वर्षे इथं बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या बगलबच्च्यांची दहशत होती. सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीही आलेला नाही, त्यामुळे अशा लोकांना जनता त्यांची जागा दाखवण्याचे काम करते.”

या संपूर्ण प्रकरणामुळे संगमनेर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिकच तणावपूर्ण झालं आहे. निवडणूक आयोगावर पक्षीय हस्तक्षेपाचे आरोप झाले असल्यामुळे आयोगाच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता आयोग या आरोपांची चौकशी करतो का आणि बाळासाहेब थोरात यांच्या तक्रारीवर कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

News Title- Balasaheb Thorat makes serious allegations against the Election Commission

Join WhatsApp Group

Join Now