बच्चू कडूंच्या जीवाला धोका; अत्यंत धक्कादायक माहिती समोर

On: June 21, 2024 1:54 PM
Bachcu Kadu
---Advertisement---

 Bachchu Kadu | प्रहार जनशक्तीचे सर्वेसर्वा आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर आली. यासंदर्भात आमदार बच्चू कडूंनी (Bachchu Kadu) स्वत: जिल्हा प्रमुख पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलं आहे.

“माझ्या जीवाला धोका”

गोपनीय माहितीनुसार, माझ्या जीवाला धोका आहे, असं बच्चू कडूंनी (Bachchu Kadu) म्हटलं आहे. माझा अपघात झाला अशा प्रकारचे नागरिकांचे फोन येताहेत. अशी अफवा पसरताना दिसत असल्याचं बच्चू कडू म्हणाले आहेत.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद करण्याची बच्चू कडूंनी मागणी केली. अशातच बच्चू कडूंच्या जीवाला धोका असल्याने खळबळ उडाली आहे. बच्चू कडू (Bachchu Kadu) हे आक्रमक आमदार म्हणून ओळखले जातात. ते स्पष्ट आणि रोखठोक भूमिका घेताना दिसतात.

“…तर मी स्वत: बच्चू कडूला संपवणार”

मी शिंदे साहेबाचा कट्टर कार्यकर्ता आहे. गडचिरोली येथे राहतो. माझे नक्षलवाद्यांशी संबंध आहे. बच्चू कडूला पाहून घेऊ. जसे बाळासाहेब ठाकरेंनी दिघेंना संपवले, तसं शिंदे साहेब बच्चू कडूला संपवणार नाहीत, तर मी स्वत: बच्चू कडूला संपवणार, अशी धमकी बच्चू कडूंना देण्यात आलीये.

दरम्यान, विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणूक लागू होणार आहे. याचपार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षांनी मतदारसंघात जात दौरे सुरू केले आहेत.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधितांवर गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद करण्याची बच्चू कडू यांनी मागणी केली आहे. सध्या बच्चू कडू यांना पोलिसांची वाय प्लस सुरक्षा आहे.

News Title – Bachchu Kadu Write Letter To Police Marathi News

महत्त्वाच्या बातम्या

“मोदींहून सुप्रिया सुळेंना अधिक लीड”; पवारांनी मोदींना डिवचलं

केंद्र सरकार पंकजा मुंडे संदर्भात ‘हा’ मोठा निर्णय घेणार!

पावसाळ्यात होणाऱ्या केसगळतीमुळे त्रस्त आहात?; करा ‘हा’ उपाय

अदिती तटकरे होणार ‘या’ जिल्ह्याच्या नव्या पालकमंत्री

विधानसभेपुर्वी शिंदे सरकार महिलांना देणार मोठं गिफ्ट?, थेट बँक खात्यावर पैसे..

Join WhatsApp Group

Join Now