‘या’ कारणामुळे बच्चू कडू दर 15 दिवसांनी एका मंत्र्याच्या गाडीची हवा सोडणार!

On: April 12, 2025 10:18 AM
Bacchu Kadu
---Advertisement---

Bacchu Kadu l शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आता रस्त्यावर उतरलेले माजी आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. जर 17 एप्रिलपर्यंत कर्जमाफीबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही, तर दर पंधरा दिवसांनी एका मंत्र्याच्या गाडीची हवा सोडणार, असा शब्दशः इशारा त्यांनी नाशिकमधून दिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्षाने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं.

“गळ्यात आसूड आहे, पण वेळ येऊ देऊ नका” – बच्चू कडू :

शुक्रवारी रात्री नाशिकमधील कोकाटे यांच्या घरी आंदोलन करताना प्रहार कार्यकर्त्यांनी ‘सातबारा कोरा करा’ अशी जोरदार मागणी केली. मात्र, कृषीमंत्री कोकाटे यांची या वेळी आंदोलकांशी भेट झाली नाही. त्यानंतर बच्चू कडू काही कार्यकर्त्यांसह सिन्नरच्या दिशेने रवाना झाले, मात्र पोलिसांनी त्यांना अडवलं.

बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना संतप्त भाषेत म्हटलं की, “माणिकराव कोकाटे कुठे लपून बसलेत? कृषीमंत्री म्हणून त्यांनी शेतकऱ्यांसमोर यायला पाहिजे होतं. मुख्यमंत्री फडणवीस सातबारा कोरा करणार म्हणाले होते, आता गप्प का बसलेत?” त्यांनी चेतावणीवजा इशारा देत म्हटलं, “गळ्यात आसूड आहे, पण त्याची वेळ येऊ देऊ नका.” (Bacchu Kadu)

Bacchu Kadu l “17 एप्रिलपर्यंत निर्णय नाही, तर गाड्यांची हवा सोडणार” :

कृषीमंत्री कोकाटे आणि बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यात फोनवरही संवाद झाला. कोकाटे यांनी सांगितले की 17 एप्रिलला शेतकरी संघटनांसोबत बैठक होणार आहे आणि तुम्हीही या. यावर कडूंनी उत्तर दिलं की, “17 एप्रिलपर्यंत आम्ही वाट पाहणार. त्यानंतर दर 15 दिवसांनी एका मंत्र्याच्या गाडीची हवा सोडणार.”

हा थेट इशारा दिल्यानंतर नाशिक आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकारवर दबाव वाढवण्यासाठी बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली असून येत्या काही दिवसांत आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

News Title: Bacchu Kadu Threatens to Deflate One Minister’s Car Tyres Every 15 Days if No Loan Waiver Decision by April 17

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now