मोठी बातमी! बच्चू कडूंना सर्वात मोठा धक्का, वाचा नेमकं काय घडलं?

On: June 19, 2025 3:38 PM
Bachchu Kadu
---Advertisement---

Bachchu Kadu | अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना मोठा धक्का बसला आहे. न्यायालयीन शिक्षेच्या पार्श्वभूमीवर विभागीय सहनिबंधकांनी त्यांना बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र ठरवले आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील सहकारी बँक राजकारणात खळबळ उडाली आहे.

बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड (Haribhau Mohod) आणि त्यांच्या गटाने बच्चू कडूंविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली होती. नाशिक न्यायालयाने बच्चू कडूंना 2021 साली एका प्रकरणात एक वर्षाची शिक्षा सुनावल्याचा दाखला देत ही मागणी करण्यात आली होती. त्यानंतर विभागीय सहनिबंधकांनी या शिक्षेचा आधार घेत त्यांना नोटीस बजावली होती.

2017 मधील गुन्ह्यांमुळे कारवाई; शिक्षा अद्याप न्यायप्रविष्ट :

2017 मध्ये नाशिकच्या सरकारवाडी पोलीस ठाण्यात बच्चू कडूंविरोधात शासकीय कामात अडथळा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात विशेष न्यायालयाने त्यांना 2021 मध्ये एक वर्षाच्या शिक्षा सुनावली. या शिक्षेला कडूंनी नागपूर खंडपीठात आव्हान दिलं असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

या शिक्षेचा दाखला देत सहनिबंधकांनी त्यांच्यावर अध्यक्षपदासाठी अपात्रतेचा ठपका ठेवला आहे. यासंदर्भात बच्चू कडूंना आपले म्हणणे सादर करण्याची संधी देखील देण्यात आली होती. मात्र आता अंतिम निर्णय देत त्यांना पदावरून दूर करण्यात आले आहे. (Bachchu Kadu)

Bachchu Kadu | पाच वर्षांपर्यंत पदासाठी अपात्र राहणार? :

विभागीय सहनिबंधकांनी दिलेल्या आदेशात पुढील पाच वर्षांसाठी बच्चू कडूंना बँकेच्या कोणत्याही पदासाठी अपात्र ठरवण्याचा विचारही अधोरेखित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू आणि त्यांच्या समर्थकांनी याविरोधात कायदेशीर लढाई लढण्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान, बच्चू कडू (Bachchu Kadu) यांचे समर्थक हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हणत असून याविरोधात पुन्हा उच्च न्यायालयात दाद मागण्याचा विचार करत आहेत. आगामी काळात या प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

News Title: Bacchu Kadu Disqualified from Amravati Bank Chairman Post Over Court Conviction, Registrar Takes Strict Action

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now