रोज जारमधील थंड पाणी पिताय?, आत्ताच व्हा सावध अन्यथा…

On: March 24, 2025 3:16 PM
Avoid Cold Water Jars in Summer Here’s Why
---Advertisement---

Cold Water Jar | उन्हाळा सुरू झाला की थंड पाण्याची मागणी झपाट्याने वाढते. तुम्हीही जारमधील थंडगार पाणी पित असाल, तर थांबा! यामागे एक गंभीर आरोग्यविषयक धोका लपलेला आहे, जो भविष्यात तुमच्या शरीरावर घातक परिणाम करू शकतो. (Cold Water Jar)

थंड पाण्याचे जार आणि त्यामधील रसायनांचा धोका

उन्हाळ्यात थंड पाण्याचे 15 ते 20 लिटरचे जार सर्रास वापरले जातात. लग्नसमारंभ, कार्यक्रम किंवा हॉटेल व्यवसायात यांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. परंतु हे पाणी फ्रीजिंग तंत्रज्ञानाने थंड केलेले नसते, तर ‘एथिलीन ग्लायकॉल’ या रसायनाच्या साहाय्याने कृत्रिम थंडपणा निर्माण केला जातो.

एथिलीन ग्लायकॉल हे एक रासायनिक द्रव्य आहे, जे पाण्याचा गोठण्याचा बिंदू कमी करतं आणि पाणी झपाट्याने थंड करतं. परंतु या रसायनाचे शरीरावर होणारे परिणाम अत्यंत गंभीर ठरू शकतात. हे पाणी पित राहिल्यास यकृत, मूत्रपिंड आणि पचनसंस्थेवर दीर्घकालीन दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.

या शिवाय, हे जार बहुधा निकृष्ट दर्जाच्या प्लास्टिकपासून बनवलेले असतात. त्यामुळे रासायनिक संयुगांशी संपर्कात येताना हे प्लास्टिक अधिक विषारी होते, आणि हे विष पाण्यात मिसळून शरीरात प्रवेश करू शकते.

माठाचे पाणी – नैसर्गिक आणि आरोग्यदायी पर्याय

उन्हाळ्यात थंडगार पाणी सर्वांनाच पिऊ वाटतं. यासाठी तुम्ही माठामधील नैसर्गिकरित्या थंड झालेलं पाणीपिऊ शकता. हे पाणी  शरीरासाठी सर्वाधिक सुरक्षित ठरतं.

माठाच्या पाण्याचे फायदे:

  • पाण्याची शुद्धता टिकते
  • पचनक्रिया सुधारते
  • त्वचेसाठी उपयुक्त
  • हाडांना मजबुती
  • मानसिक शांती मिळते
  • शरीरातील उष्णता नैसर्गिकरीत्या नियंत्रित राहते

त्यामुळे थंडगार जारचे आकर्षण टाळून, माठातील पाणी प्यायल्याने शरीरावर कोणतेही रासायनिक दुष्परिणाम होत नाहीत आणि दीर्घकालीन आरोग्य सुरक्षित राहतं.

Title : Avoid Cold Water Jars in Summer Here’s Why

 

Join WhatsApp Group

Join Now