Maharashtra l लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रायगड येथील ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल नवगणेंवर (Anil Navgane) यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. नवगणेंवर यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे.
नवगणेंवर शिंदे गटाकडून हल्ला केल्याचा आरोप :
रायगड येथील ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल नवगणेंवर यांच्यावर हल्ला करण्यात आलं आहे. हा हल्ला रात्री 10.30 च्या सुमारास झाला आहे. नवगणेंवर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. मात्र आता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मोठा आरोप करण्यात आलं आहे. नवगणेंवर यांच्यावर झालेला हल्ला हा शिंदे गटाकडून करण्यात आलाचा आरोप करण्यात आला आहे.
जिल्हा प्रमुख अनिल नवगणेंवर हे इंदापूरला जात असताना लोणेर वीर दरम्यान हा हल्ला झाला आहे. या घटनेनंतर हल्लेखोरांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. आता याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात केली आहे. तसेच माणगाव पोलिसांकडून हल्लेखोरांचा तपास सुरू आहे.
Maharashtra l हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट :
या धक्कादायक हल्ल्यानंतर घटनास्थळी जोरदार राडा झाला आहे. मात्र या हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी सुसाट पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनाास्थळी पोहचले आहे. या हल्ल्यात सुदैवाने जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांना कोणतीही इजा झालली नाही. मात्र नवगणे यांच्या कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अनिल नवगणे यांच्या हल्ल्यानंतर रायगडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेमुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी ही स्थिती संयमानी हाताळली आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास माणगाव पोलीस करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत हा हल्ला झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. माात्र हा हल्ला का केला? व कोणी केला…तसेच यामागे काही राजकीय हेतू होता का? याचा तपास पोलीस करत आहेत.
News Title – Attack on thackeray group Raigad district chief anil navgane
महत्त्वाच्या बातम्या –
या राशीच्या व्यक्तींनी सावधान; मित्रांशी मतभेदाची शक्यता
विखेंच्या कार्यकर्त्यांनी खोटा संदेश सोशल मीडियात व्हायरल केला, अण्णांच्या भूमिकेमुळे विखे संकटात!
‘तुमच्यामुळे माझी आई गेली’; गावकऱ्याने सुजय विखेंना विचारला जाब
सुरेश रैनावर कोसळला दुःखाचा डोंगर; घरातील व्यक्तीचा अपघातात मृत्यू






