Athiya Shetty | सनरायजर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 57 व्या सामन्यात अनेक रंजक गोष्टी घडल्या. या सामन्यात हैदराबादने लखनऊवर 10 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला. हैद्राबादच्या ओपनर्सनी केलेल्या तूफान माऱ्यामुळे संघाने 10 षटकांच्या आत सामना आपल्या बाजूने करत दणदणीत विजय मिळविला.
मात्र, सामन्यानंतर लखनऊचा कर्णधार के.एल राहुल आणि एलएसजीचे मालक डॉ. संजीव गोयंका यांच्यात मैदानातच काहीतरी संभाषण झालं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला. यात संजीव गोयंका राहुलवर चिडताना दिसून आले. यानंतर चाहत्यांनी संताप व्यक्त केला होता. अशात अभिनेत्री तथा राहुलची बायको अथिया शेट्टी नवऱ्याची बाजू घेण्यासाठी समोर आली आहे.
अथिया शेट्टीने एक पोस्ट शेअर केली असून लोक आता या पोस्टचे कनेक्शन त्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओसोबत जोडत आहेत. या पोस्टमधून अथिया शेट्टीने खास संदेश दिल्याचे देखील सांगितलं जातंय. त्यामुळे अथियाची ही पोस्ट आता चर्चेत आली आहे.
अथियाने पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?
मुंबईमध्ये 13 मे ला मोठे वादळ आले होते आणि त्यानंतर पाऊस देखील पडला. आता तोच फोटो शेअर करत अथिया शेट्टीने एक पोस्ट शेअर केली आहे. अथिया शेट्टीने वादळानंतरची शांतता, म्हणत खास फोटो शेअर केलाय.तिची ही पोस्ट आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओसोबत जोडली जातेय.
अथिया शेट्टी (Athiya Shetty) हिने 2023 मध्ये क्रिकेटर केएल राहुल याच्यासोबत लग्न केले. पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांनी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या अगोदरही अथिया शेट्टी राहुल याला सपोर्ट करण्यासाठी कायमच स्टेडियममध्ये पोहचत असत. सध्या केएल राहुल याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय.
या व्हिडिओमुळे चाहत्यांकडूनही संताप व्यक्त केला जातोय.सोशल मीडियावर केएल राहुल आणि भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांनी संजीव गोयंका यांना चांगलंच झापलं आहे. केएल राहुल हा भारतीय क्रिकेटर आहे आणि त्याला अशाप्रकारे बोलणे चुकीचे असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे, लोक संजीव गोयंका यांना खडसावताना दिसत आहेत.
News Title : Athiya Shetty post viral
महत्त्वाच्या बातम्या-
उर्फी जावेदने केलंय टक्कल?; फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल
उपोषणाबाबत मनोज जरांगेंची सर्वात मोठी घोषणा!
“माझ्यावर प्राईस टॅग लावून, मला झोपायला…”, करिश्मा कपूरने केला सर्वात मोठा खुलासा
मुंबईत पावसाचा धुमाकूळ, आता पुण्याची बारी..?; हवामान विभागाचा मोठा इशारा






