अटल सेतूवरून उडी मारून तरुणाने संपवलं आयुष्य; 28 वर्षीय युवकाचा समुद्रात शोध सुरू

On: June 9, 2026 9:53 AM
Atal Setu
---Advertisement---

Atal Setu | अटल सेतू पुलावरून समुद्रात उडी मारणाऱ्या २८ वर्षीय तरुणाचा अद्यापही शोध लागलेला नाही. रविवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे.

घटनेची सविस्तर पार्श्वभूमी

मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिक सुभाष रासकर असे या तरुणाचे नाव असून तो पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्याचा रहिवासी होता. तो शेअर मार्केट क्लासेसशी संबंधित काम करत होता. रविवारी रात्री घरच्यांना बाहेर जेवायला जात असल्याचे सांगून तो घराबाहेर पडला होता.

यानंतर प्रतिक आपल्या कारने Atal Setu येथे आला. पुलावरील यंत्रणांची नजर चुकवत त्याने समुद्रात उडी घेतल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना ७ जून रोजी रात्री १ वाजून २९ मिनिटांच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे.

उलवे पोलिसांकडून शोधमोहीम आणि आवाहन

घटनेची माहिती मिळताच Ulwe Police Station पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. दिवसभर समुद्रात शोधकार्य सुरू ठेवण्यात आले, मात्र अद्याप प्रतिकचा मृतदेह सापडलेला नाही. प्रतिकने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी प्रतिकची माहिती आणि वर्णनही जाहीर केले आहे. त्यानुसार त्याचा रंग गोरा, शरीरयष्टी मजबूत, उंची अंदाजे ५ फूट १० इंच असून काळे वाढलेले केस, काळे डोळे आणि वाढलेली दाढी-मिशी अशी त्याची ओळख आहे. घटनेच्या वेळी त्याने पांढरा शर्ट आणि ग्रे रंगाची पॅन्ट परिधान केली होती. तो मराठी आणि हिंदी भाषा बोलत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, या प्रकरणी कोणालाही माहिती मिळाल्यास तात्काळ Ulwe Police Station शी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

News Title: Atal Setu Navi Mumbai Pratik Subhash Raskar end his life

Join WhatsApp Group

Join Now