Arvind Kejriwal Bail | दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना नुकताच जामीन (Arvind Kejriwal Bail) मंजूर झाला असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. यामुळे आता आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवला यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात पक्षाच्या प्रचारासाठी काही दिवसांसाठी बेल देण्यात आली होती. मात्र आता एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने जामीन मंजूर केला. (Arvind Kejriwal Bail)
Delhi excise policy case | Rouse Avenue court allows the bail application of CM Arvind Kejriwal and grants bail to him on a bail bond of Rs 1 lakh
(File photo) pic.twitter.com/kAsqVTYVtu
— ANI (@ANI) June 20, 2024
अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीला मोठा दिलासा
जामिनाला विरोध करण्यासाठी ईडीने त्यांना तब्बल 48 तास वेळ मागितला होता. शुक्रवारी कर्तव्य न्यायाधिशांसमोर युक्तीवाद करता येईल, असं न्यायालयाने म्हटलं आहे. दरम्यान केजरीवाल यांच्यावर दिल्लीत कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून मनी लाँड्रिंगची कारवाई केली आणि त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र आता अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीला मोठा दिलासा मिळाला आहे. (Arvind Kejriwal Bail)
अरविंद केजरीवाल यांना मे महिन्यात लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी तुरूंगाबाहेर येण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर आता निवडणूक संपताच त्यांना तिहार जेलमध्ये अटक करण्यात आलं. अशातच आता अरविंद केजरीवाल यांना नियमित जामीन (Arvind Kejriwal Bail) मिळाला आहे.
ईडीने सुनावणी केली होती त्यानंतर न्यायाधिश बिंदू यांनी हा निर्णय राखून ठेवला होता. यावेळी बचाव पक्षाने फिर्यादीकडे कोणतेही पुरावे नसल्याचा दावा केला. यामुळे आप नेत्याला दोषी ठरवता आलं नाही, अशी माहिती आहे.
फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला
दरम्यान अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाल्याने आम आदमीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला आहे. यामुळे लोकशाहीला बळकटी प्राप्त झाली असल्याची प्रतिक्रिया खासदार संजय सिंह यांनी दिली.
#WATCH | Firecrackers being burst by AAP workers outside the residence of Delhi CM Arvind Kejriwal in Delhi.
Delhi’s Rouse Avenue Court today granted bail to CM Kejriwal on a bond of Rs 1 lakh in the excise policy case. pic.twitter.com/ROOq0FVP4K
— ANI (@ANI) June 20, 2024
News Title – Arvind Kejriwal Bail From Tihar Jail News Update
महत्त्वाच्या बातम्या
सलमान खान गोळीबार प्रकरणी मोठी माहिती समोर!
“काहीही करा पण…”; शरद पवारांची शेतकऱ्यांना कळकळीची विनंती
TMKOC च्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर!
राज्यातील ‘या’ भागाला हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 6 दिवसांपर्यंत कोसळणार पाऊस
राज्यातील ‘या’ भागात पुढील तीन दिवस धो धो पाऊस कोसळणार, यलो अलर्ट सारी






