‘सहा पत्नींसोबत एकत्र झोपता यावं म्हणून 81 लाखांचा बेड’; हा प्रसिद्ध मॉडेल चर्चेत

On: April 12, 2025 2:54 PM
---Advertisement---

Arthur O Urso Brazillian model  | ब्राझीलचा प्रसिद्ध मॉडेल, डीजे आणि एमएमए कोच ऑर्थर ओ उर्सो सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. सोशल मीडियावर कायमच चर्चेचा विषय असणाऱ्या ऑर्थरने आपल्या वैवाहित आणि वैयक्तिक जीवनशैलीने जगभरातील लोकांचं लक्ष वेधलं आहे. २०२१ मध्ये त्यानं एकाच वेळी नऊ महिलांशी लग्न करत ‘फ्री लव्ह’चा संदेश दिला होता. हे लग्न कोणत्याही कायदेशीर बंधनात नव्हतं, पण प्रेम आणि समर्पणाच्या आधारावर त्यांनी सहजीवन सुरू केलं.

२० फूट लांब बेडसाठी ८१ लाखांचा खर्च

ऑर्थरचा जीवनशैलीतला आणखी एक भन्नाट निर्णय म्हणजे त्याने आपल्या सहा पत्नींसोबत एकत्र झोपता यावं म्हणून तयार केलेला २० फूट लांबीचा भलीमोठी पलंग. यासाठी त्याने तब्बल ८१ लाख ५४ हजार रुपये खर्च केले. “सर्व बायकांना एकसमान जागा मिळावी, यासाठी मला आधी जमिनीवर झोपावं लागत होतं. म्हणून मी हा निर्णय घेतला,” असं त्याने इन्स्टाग्रामवर सांगितलं. या फोटोंना प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.

ऑर्थर सोशल मीडियावर सतत अ‍ॅक्टिव्ह असतो. आपल्या सर्व पत्नींसोबतचे फोटो, व्हिडीओ तो नेहमी इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. त्याच्या जीवनशैलीमुळे अनेक जण त्याचं कौतुक करतात, तर काहीजण टीकाही करतात. त्याच्या फिटनेसबद्दलही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगते. तो तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज मोठ्या प्रमाणात अंडी खातो.

जरी ऑर्थरने नऊ महिलांशी विवाह केला असला, तरी काही नाती फार काळ टिकली नाहीत. त्याला चार बायकांनी नंतर घटस्फोट दिला. सध्या तो पाच पत्नींसोबत राहतोय.

“प्रत्येक पत्नीपासून एक मूल हवं”

ऑर्थरचं स्वप्न आहे की, प्रत्येक पत्नीपासून त्याला एक मूल हवं, जेणेकरून कोणतीही पत्नी उपेक्षित वाटणार नाही. त्याचा हा दृष्टिकोन वेगळा असला तरी तो प्रेम आणि समतेच्या तत्त्वावर ठाम आहे. त्यामुळेच आज त्याचं वैवाहिक जीवन चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरतंय. आर्थरचं हे आयुष्य जितकं विचित्र, तितकंच लोकांचं लक्ष वेधून घेणारं आहे.

Title : Arthur O Urso Brazillian model 81 Lakh Bed Six Wives Story

Join WhatsApp Group

Join Now