April 2025 Horoscope | एप्रिल महिन्याची सुरुवात काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. शुक्र आणि बुध ग्रहांच्या उदयानंतर चार राशींवर विशेष कृपा राहणार आहे. नवा प्रवास, आर्थिक उन्नती, करिअरमध्ये यश आणि कौटुंबिक सुख मिळण्याची संधी या व्यक्तींना मिळू शकते, असं ज्योतिषांचं मत आहे. (April 2025 Horoscope)
शुक्र-बुध उदयानंतर 4 राशींचं नशीब चमकणार
28 मार्च रोजी सकाळी 6.50 वाजता शुक्र ग्रहाचा उदय होणार आहे. त्यानंतर 31 मार्च संध्याकाळी 5.57 वाजता बुध ग्रह मीन राशीत उदयास येणार आहे. हे दोन्ही ग्रह जेव्हा सक्रिय होतात, तेव्हा काही राशींवर त्यांचा सकारात्मक प्रभाव जाणवतो. यंदा मिथुन, सिंह, वृश्चिक आणि मकर या चार राशींवर या ग्रहांचा चांगला प्रभाव राहणार असून एप्रिल महिना त्यांच्या जीवनात नवे यश घेऊन येईल.
‘या’ 4 राशींना शुभ काळ
मिथुन (Gemini): शुक्र आणि बुध या दोन्ही ग्रहांच्या कृपेमुळे या राशीच्या व्यक्तींना वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यात आनंदाचे क्षण लाभतील. विवाहासाठी योग्य वेळ असून, संतानप्राप्तीची शक्यता आहे. मनासारखे सहजीवन आणि सकारात्मक उर्जा यामुळे जीवनात उत्साह वाढेल.
सिंह (Leo): कामकाजाच्या क्षेत्रात इच्छित बदल घडतील. नव्या संधी मिळतील, गुंतवणुकीतून लाभ होईल. आरोग्याच्या समस्या दूर होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. या काळात मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्या तुमच्या यशात भर घालतील.
वृश्चिक (Scorpio): आर्थिक दृष्टिकोनातून एप्रिल महिना अत्यंत लाभदायक ठरेल. उत्पन्नात वाढ होईल. दीर्घकाळ प्रलंबित असलेले आर्थिक व्यवहार पूर्ण होऊ शकतात. दांपत्य जीवनात गोडवा येईल. परदेश प्रवासाची शक्यता असल्यामुळे विमानप्रवासाचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. (April 2025 Horoscope)
मकर (Capricorn): उत्पन्नाचे नवीन मार्ग उपलब्ध होतील. नोकरीतील प्रगती आणि प्रमोशनचे योग संभवतात. व्यवसायात विस्तार होईल. तुमचं काम वरिष्ठांच्या नजरेत येईल आणि तुम्हाला जबाबदारीच्या संधी मिळतील. आर्थिक स्थैर्य मिळाल्यामुळे आत्मविश्वासात वाढ होईल.
Title : April 2025 Horoscope good Luck for These 4 Zodiac Signs






