गुड न्यूज! Apple च्या पहिल्या फोल्डेबल iPhone ची संभाव्य किंमत समोर

On: March 20, 2025 12:04 PM
Apple Foldable iPhone Launching in 2026 
---Advertisement---

Apple foldable iPhone | Apple आपल्या पहिल्या फोल्डेबल iPhone वर जोरदार काम करत असून, हा फोन 2026 च्या अखेरीस किंवा 2027 च्या सुरुवातीला बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. या प्रीमियम डिव्हाइसची संभाव्य किंमत ₹1,66,000 ते ₹2,08,000 दरम्यान असणार आहे. (Apple foldable iPhone)

काही रिपोर्टनुसार, हा फोल्डेबल iPhone 2026 च्या अखेरीस किंवा 2027 च्या सुरुवातीला लॉन्च होऊ शकतो. या फोनबाबत वापरकर्ते प्रचंड उत्सुक आहेत. त्याची किंमत काय असणार, फीचर्स काय असणार? याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे.

फोल्डेबल iPhone ची संभाव्य किंमत

काही अहवालनुसार, हा फोन 2300 डॉलर्स (₹1,91,000) पर्यंतच्या किंमतीत लाँच होऊ शकतो. Ming-Chi Kuo यांनी देखील $2000 ते $2500 (₹1,66,000 ते ₹2,08,000) पर्यंतच्या किंमतीचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे Apple च्या फोल्डेबल फोनची किंमत Samsung Galaxy Z Fold मालिकेपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.

संभाव्य स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले:
7.8-इंचाचा फोल्डेबल डिस्प्ले
5.5-इंचाचा कव्हर डिस्प्ले

कॅमेरा:
ड्युअल रियर कॅमेरा सेटअप

बॅटरी आणि डिझाईन:
हाय-डेंसिटी बॅटरी, जास्त बॅकअप
अनफोल्ड केल्यावर साईज  – 4.5mm, फोल्ड केल्यावर – 9mm ते 9.5mm
टायटॅनियम फ्रेम, स्टेनलेस स्टीलसह मजबूत हिंज

सुरक्षा:
Touch ID सह पॉवर बटण

Apple समोरील अडचणी

हिंज टेक्नॉलॉजी पहिल्यांदाच फोल्डेबल डिव्हाइस बनवत असल्याने Apple साठी हिंज मजबूत आणि टिकाऊ बनवणे मोठे आव्हान असेल. तसेच, Samsung, Google Pixel सारख्या कंपन्यांनी डिस्प्ले क्रीज सुधारण्याचे प्रयत्न केले असले तरी, अजूनही ही समस्या कायम आहे. Apple कडे ही समस्या सोडवण्यासाठी कोणते तंत्रज्ञान असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Title : Apple Foldable iPhone Launching in 2026 

 

Join WhatsApp Group

Join Now