ब्राह्मणांवरील वक्तव्यामुळे ट्रोल झालेला अनुराग कश्यप अखेर नरमला; माफी मागत म्हणाला…

On: April 19, 2025 8:11 AM
Anurag Kashyap Apologizes Partially Amid Brahmin Row
---Advertisement---

Anurag Kashyap | प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) याने  ब्राह्मण समाजाविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानानंतर उभ्या राहिलेल्या वादळाला थोपवण्यासाठी अखेर माफी मागितली आहे. मात्र, ही माफी फक्त एका विशिष्ट वाक्यावर मर्यादित असून, त्यावरून वाद शांत होण्याऐवजी आणखी पेटण्याची शक्यता आहे.

अनुराग कश्यप काय म्हणाला?

सध्या ब्राह्मण समाजात संतापाची लाट पसरली आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यपने (Anurag Kashyap) ब्राह्मणांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. इतकंच नव्हे तर (Mumbai Police) मुंबई पोलिसांकडे त्याच्या विरोधात अधिकृत तक्रारही दाखल झाली आहे.

अखेर वाढलेल्या दबावामुळे अनुरागने स्वत: इन्स्टाग्रामवर पोस्ट करत स्पष्टीकरण देत माफी मागितली. मात्र, त्याने स्पष्ट केलं की ही माफी पूर्ण पोस्टसाठी नसून केवळ त्या वाक्यासाठी आहे ज्याचा चुकीच्या संदर्भात वापर करून द्वेष निर्माण केला गेला. “बोललेले शब्द परत घेता येत नाहीत आणि मीही ते घेणार नाही,” असं त्याने आपल्या शैलीत ठामपणे सांगितलं.

सेन्सॉर बोर्डाच्या भूमिकेवरून निर्माण झाला वाद

‘धडक 2’ आणि (Phule Movie) ‘फुले’ सिनेमाच्या प्रदर्शनावरून सुरू झालेल्या वादात अनुरागने उडी घेतली. ‘फुले’ सिनेमावर काही ब्राह्मण संघटनांनी आक्षेप घेतल्यावर, त्याच्या समर्थनार्थ अनुरागने ब्राह्मणांवर निशाणा साधला होता. यावरून सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. (Tejinder Pal Singh Bagga) भाजप नेते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी तर अनुराग कश्यपविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.

या विधानानंतर वाद निर्माण झाल्यानंतर अनुरागने अखेर माफी मागितली. त्याने त्याच्या माफीनाम्यात असंही म्हटलं, “माझ्याकडून माफी हवी असेल, तर घ्या माझी माफी. पण आधी ठरवा तुम्ही कोणते ब्राह्मण आहात.”

म्हणजेच माफी मागून अनुराग कश्यपने जरी नरमाईचा सूर घेतला असला, तरी त्याची भूमिका अजूनही ठाम आणि आक्रमक आहे. त्यामुळे या प्रकरणाचा वाद आणखी काही काळ सोशल मीडियावर चघळला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Title : Anurag Kashyap Apologizes Partially Amid Brahmin Row

 

Join WhatsApp Group

Join Now